Sanjay dhotre
Sanjay dhotre 
Loksabha 2019

LokSabha 2019 : अखेर संजय धोत्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब 

मनोज भिवगडे

अकोला : भारतीय जनता पक्षाचे अकोला लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या उमेदवारीबाबत उपस्थित केल्या जात असलेल्या शंकांना पूर्णविराम देत त्यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली.
 गेल्या काही दिवसांपासून संजय धोत्रे यांना भाजपची उमेदवारी मिळणार किंवा नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. धोत्रे यांच्या जागेवर काही नावेही पुढे आली होती. त्यात प्रामुख्याने शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष व प्रसिद्ध विकासक सुरेश हावरे यांचे नाव होते. या सगळ्या शंकांना पूर्णविराम देत भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील 16 भाजपा उमेदवारांचा समावेश आहे. त्यात अकोला लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.

खासदार संजय धोत्रे यांची उमेदवारी पक्षाने कायम ठेवल्यामुळे त्यांच्या राजकीय विरोधकांना ही मोठी चपराक मानली जात आहे. उमेदवारी जाहीर होताच खासदार धोत्रे यांच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आता अकोला लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नसली तरी मराठा समाजातीलच डॉक्टर अभय पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर वंचित बहुजन आघाडीचे अॅड.प्रकाश आंबेडकर हेसुद्धा अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे.

विरोधकांचे मनसुबे उधळले खासदार संजय धोत्रे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून त्यांच्याच पक्षातील काही नेते व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपतर्फे करण्यात आलेल्या सर्वेमध्ये धोत्रे यांचे कामगिरीबाबत शासंकता व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी सर्व विरोधकांचे मनसुबे उधळत उमेदवारी मिळविली आहे. हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा मोठा विजय मानला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT