Loksabha 2019

Loksabha 2019 :  मावळ, शिरूरमध्ये आज प्रचार थंडावणार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - लोकसभेच्या मावळ मतदार संघातील प्रचाराची सांगता शनिवारी (ता. २७) सायंकाळी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर तीन दिवस दोन्ही मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अर्थात शनिवारी आपापल्या प्रभागांमध्ये कार्यकर्ते पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची चिंचवडेनगरमध्ये सभा घेऊन महायुतीच्या प्रचाराचा समारोप होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (ता.२९) मावळ मतदान होत आहे. प्रचाराची सांगता होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरीत महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शुक्रवारी बैठक घेतली. त्याला खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ॲड. गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव यांच्यासह मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी काळभोरनगरमध्ये महाआघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली भागातून शहरात स्थायिक झालेल्या रहिवाशांचा मेळावा घेतला. शनिवारी महायुती व महाआघाडीतर्फे शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघांतील वॉर्डावॉर्डात पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी आखणी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी केली आहे. त्याचे नियोजन विधानसभा प्रमुख, वॉर्डप्रमुख, स्थानिक नगरसेवक, बुथस्तरीय कार्यकर्त्यांवर सोपविली आहे. 

असा राहणार आजचा प्रचार 
 महायुती व महाआघाडीच्या पदयात्रा
 सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची चिंचवडेनगरला सभा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT