Stamp Duty sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! महिलांच्या नावे घर खरेदीवेळी मुद्रांक शुल्कात १ टक्का सूट; बांधकाम व्यावसायिकांप्रमाणे राज्यात कोणत्याही जिल्ह्यात प्रॉपर्टीची खरेदी-विक्री

सदनिका (रहिवासी घर) खरेदीचा व्यवहार तथा दस्त नोंदणी महिलेच्या नावे होते, त्यावेळी मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत दिली जाते. खुली जागा, शेतजमीन किंवा व्यावसायिक गाळ्यांची खरेदी महिलांच्या नावे जरी होत असेल, तरी त्यांना मुद्रांक शुल्कात कोणतीही सवलत मिळत नाही, असे मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी श्रीराम कोळी यांनी सांगितले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सदनिका (रहिवासी घर) खरेदीचा व्यवहार तथा दस्त नोंदणी महिलेच्या नावे होते, त्यावेळी मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत दिली जाते. खुली जागा, शेतजमीन किंवा व्यावसायिक गाळ्यांची खरेदी महिलांच्या नावे जरी होत असेल, तरी त्यांना मुद्रांक शुल्कात कोणतीही सवलत मिळत नाही, असे मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी श्रीराम कोळी यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यासाठी २०२६-२७ या वर्षासाठी ६५० कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्काचे उद्दिष्ट्य आहे. मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून तेवढा महसूल शासनाला मिळाला होता. दरम्यान, आता ‘एक जिल्हा एक नोंदणी’ सुरु आहे, पण आगामी काळात ‘एक राज्य एक नोंदणी’ प्रणाली विकसीत होणार आहे. त्यावेळी मुंबई-पुण्यासह राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती, आहे त्या ठिकाणाहून जमीन, जागा, सदनिकेची दस्तनोंदणी करु शकणार आहे. त्यासाठी त्याला दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागणार नाही. सायबर कॅफे किंवा सेतू सुविधा केंद्रामध्येही अशी सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. प्रॉपर्टीच्या मूल्यांकनानुसार शासनाला मुद्रांक शुल्क ऑनलाईन भरल्यानंतर त्या मालमत्तेची दस्तनोंदणी तेथूनच ऑनलाईन होऊ शकेल अशी ही व्यवस्था असेल, असेही श्री. कोळी यांनी सांगितले.

राज्यात कुठूनही ऑनलाईन दस्तनोंदणी

सध्या बांधकाम व्यावसायिकांनी अपार्टमेंट नोंदविल्यावर त्यांना मुद्रांक शुल्क विभागाकडून पहिले करारपत्र करण्याचा परवाना मिळतो. बांधकाम व्यावसायिक त्यांच्या कार्यालयातूनच ज्यांनी सदनिका घेतली, त्यांच्यासोबत पहिले करारपत्र करतो. त्यानंतर ते करारपत्र मुद्रांक शुल्क विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयाकडे ऑनलाईनच येते. त्यानुसार दुय्यम निबंधक कार्यालयात त्यातील सर्व कागदपत्रे पडताळून नोंदणी पूर्ण केली जाते. त्यासाठी सदनिका खरेदी करणारा व बांधकाम व्यावसायिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागत नाही. अशीच प्रणाली आता इतरांसाठी देखील उपलब्ध करुन दिली जाणार आहे. काही महिन्यांत ही प्रणाली कार्यान्वित होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘एक राज्य एक नोंदणी’ प्रणालीचे काम सुरु

प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अधिक सुलभता यावी म्हणून महसूल विभागाकडून नवी प्रणाली विकसीत केली जात आहे. त्यानुसार आगामी काळात कार्यवाही सुरु होईल. आता महसूल विभागाच्या नव्या निर्णयानुसार एकाच कुटुंबातील सहहिस्सेदारांचे वाटणीपत्र २०० रुपयांत होण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यात १०० रुपये नोंदणी शुल्क व १०० रुपयांचे मुद्रांक शुल्क घेतले जाते.

- श्रीराम कोळी, मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT