Farmers crop insurance esakal
महाराष्ट्र बातम्या

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

खरीप पिकांसाठी आता पीकविमा काढण्याची कार्यवाही सुरू असून पीकविम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. डाळिंबासाठी १४ जुलै तर सिताफळासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. आतापर्यंत राज्यातील दहा लाख शेतकऱ्यांन पिकविमा भरला असून उर्वरित शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी आता १८ दिवसच शिल्लक आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : खरीप पिकांसाठी आता पीकविमा काढण्याची कार्यवाही सुरू असून पीकविम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. डाळिंबासाठी १४ जुलै तर सिताफळासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. आतापर्यंत राज्यातील दहा लाख शेतकऱ्यांन पिकविमा भरला असून उर्वरित शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी आता १८ दिवसच शिल्लक आहेत.

पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा एक रुपयात पीकविमा नसणार आहे. त्यांना विमा संरक्षित रकमेच्या प्रमाणात निश्चित झालेली रक्कम भरावी लागेल. पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना १ ऑगस्टनंतर शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करावी लागणार आहे. याशिवाय ॲग्रीस्टॅकची नोंदणी नसेल तर त्या शेतकऱ्यांना पीकविमा भरताच येत नाही. गतवर्षी राज्य सरकारच्या एक रूपया पीकविमा योजनेमुळे राज्यातील तब्बल एक कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. यंदा मात्र, १ ते १३ जुलैपर्यंत दहा लाख शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर उंबरठा उत्पन्न व अपेक्षित उत्पन्न, यातील घटीवर नुकसान भरपाई मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी ‘ॲग्रीस्टॅक’चे बंधनकारक

शेतीसंबंधी पीकविमा असो की अन्य शासकीय योजनांच्या लाभासाठी आता ॲग्रीस्टॅकची नोंदणी व त्याचा क्रमांक बंधनकारक आहे. शेतकऱ्यांची मालकी व शेतकऱ्यांच्या नावावरील सर्व शेतीची नोंद एकाच ठिकाणी करण्यासाठी ॲग्रीस्टॅकची नोंदणी केली जात आहे. राज्यातील एक कोटी ७१ लाख शेतकऱ्यांपैकी एक कोटी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली असून आणखी ७१ लाख शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकची नोंदणी केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : कात्रज घाटात एसटी बंद पडल्याने भीषण ट्रॅफिक जॅम; वाहनांच्या ३-४ किमी लांब रांगा

Bargi Dam Accident: क्रूझ कापून वाचवले जीव! मृतांच्या कुटुंबीयांना भेटून मुख्यमंत्री भावूक, बरगी धरण अपघातावर कठोर कारवाईची तयारी

Hasan Mushrif Statement : “गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावूनच प्रतिक्रिया,” हसन मुश्रीफांनी शिवाजी पाटलांना थेट डिवचलं

Mumbai: पुनर्वसन ४० वर्षे रखडले; उच्च न्यायालयाचे केंद्र, ‘जेएनपीए’ला खडे बोल

SCROLL FOR NEXT