shinde group esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: भाजपलाच धक्का; 100 हून अधिक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात राज्यात नवं सरकार स्थापन केलं.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत भाजपसोबत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक असे अनेक धक्के बसले. पण आता एकनाथ शिंदे यांनी भाजपलाच धक्का दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबईतील 100 हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे.(100 office bearers of bjp joined the shinde group in mumbai Devendra Fadnavis)

दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत काल भाजपच्या 100 हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. प्रकाश सुर्वे यांनी स्वतः या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाचे फोटो ट्विट केले आहेत. सुर्वे यांच्या मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 25 मधील भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

शिवसेना-राष्ट्रवादीनंतर शिंदे गटाने सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदारांना गळाला लावले.

त्यानंतर हळूहळू राज्यभरातून वेगवेगळ्या शहरांमधल्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिंदे गटने थेट मित्रपक्षाला धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर राज्यातील राजकारणाला नवं वळण लागणार तर नाही ना? असे सवाल उपस्थित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT