vehicle choice numbers sakal
महाराष्ट्र बातम्या

हौसेला नाही मोल, चॉईस नंबरसाठी 11000 वाहन मालकांनी मोजले 11 कोटी रुपये; 0001 क्रमांकासाठी सर्वाधिक 5 लाखांचे शुल्क; कोणत्या क्रमाकांला किती शुल्क?

'हौसेला मोल नसतं', याची प्रचिती आरटीओ कार्यालयातून आपल्या वाहनांसाठी खरेदी केलेल्या चॉईस क्रमांकाच्या रकमेतून स्पष्ट झाले आहे. २३ महिन्यांत सोलापूर आरटीओ कार्यालयातून ११ हजार ७१ मालकांनी चॉईस क्रमांक घेतले आहेत. त्यासाठी त्यांनी तब्बल ९ कोटी ४७ लाख ६७ हजार ५०० रुपये मोजले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : हौसेला मोल नसतं म्हणतात, याची प्रचिती आरटीओ कार्यालयातून आपल्या वाहनांसाठी खरेदी केलेल्या चॉईस क्रमांकाच्या रकमेतून स्पष्ट झाले आहे. २३ महिन्यांत सोलापूर आरटीओ कार्यालयातून ११ हजार ७१ मालकांनी स्वत:च्या वाहनासाठी चॉईस क्रमांक घेतले आहेत. त्यासाठी त्यांनी तब्बल ९ कोटी ४७ लाख ६७ हजार ५०० रुपये मोजले आहेत. याशिवाय अकलूज आरटीओ कार्यालयातूनही जवळपास एक हजार वाहनधारकांनी चॉईस नंबरसाठी दोन कोटींपर्यंत शुल्क भरले आहे.

लहान असताना इतरांकडील किंवा शेजारच्यांकडील, मित्र-नातेवाईकांकडील वाहन पाहून अनेकांना आपणही पुढे मोठा झाल्यावर अशीच गाडी घेऊ असे स्वप्न असते. शिक्षण घेऊन नोकरीला लागल्यावर अनेकजण काही वर्षांतच चारचाकी वाहन खरेदी करतात. याशिवाय अन्य उद्योजक, छोटे-मोठे व्यावसायिक, राजकीय पुढारी, साखर कारखानदार, आमदार-खासदार व त्यांच्या जवळील लोक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांकडे देखील महागडी वाहने असतात. आपण कोणत्याही गावात किंवा कोठेही गेलो तर आपल्या गाडीच्या व्हीआयपी क्रमांकावरून आपली ओळख निर्माण व्हावी, असे बहुतेक वाहन मालकांची अपेक्षा असते. त्यातूनच गाडीच्या किमतीएवढी किंवा पाच लाख रुपयांपर्यंत शुल्क भरून अनेकजण आरटीओ कार्यालयातून वाहनासाठी चॉईस क्रमांक घेतात. त्यातूनच सोलापूर व अकलूज या दोन्ही आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून शासनाला २३ महिन्यांमध्ये साधारणत: साडेअकरा कोटी रुपये मिळाले आहेत.

‘या’ सहा क्रमांकासाठी सर्वाधिक शुल्क

आरटीओ कार्यालयाकडून आपल्या वाहनाला पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी वाहनाचे मालक वाहनाच्या किंमतीएवढेच पैसे मोजायला तयार असतात हे दिसून आले आहे. ०००१ या क्रमांकासाठी दुचाकी व तीन चाकी वाहनधारकांना एक लाख रुपये तर अन्य वाहनांसाठी पाच लाख रुपयांचे शुल्क आहे. तर ०००९, ००९९, ०७८६, ०९९९, ९९९९ या क्रमांकासाठी दुचाकी व तीन चाकी वाहनधारकांना ५० हजार रुपये तर अन्य वाहन मालकांसाठी या क्रमांकांची किंमत अडीच लाख रुपये इतकी आहे. अन्य क्रमांकांच्या तुलनेत सहा क्रमांकासाठी ५० हजार ते पाच लाख रुपयांचे शुल्क मोजावे लागते. जवळपास ५०० चॉईस क्रमांकासाठी पाच हजार ते पाच लाखांपर्यंत शुल्क आहे.

चॉईस क्रमांक अन्‌ मिळालेले शुल्क

(१ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२४)

  • चॉईस नंबर घेतलेले वाहनधारक

  • ४,६४४

  • वाहन मालकांनी मोजलेली रक्कम

  • ४,२८,१८,००० रुपये

----------------------------------------------

(१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४)

  • चॉईस नंबर घेतलेले वाहनधारक

  • ६,५२७

  • वाहन मालकांनी मोजलेली रक्कम

  • ५,१९,४९,५०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT