11 IAS officers in State has been transferred
11 IAS officers in State has been transferred  
महाराष्ट्र

राज्यातील 11 'आयएएस' अधिकाऱ्यांच्या बदल्या

वृत्तसंस्था

मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय सेठी यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार होता. मात्र, आता संजय सेठी यांच्याकडे हा पदभार सोपविण्यात येणार आहे. तर डॉ. मुखर्जी यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तसेच सध्याचे 'सीकॉम'चे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) डॉ. के. एच. गोविंदा राज यांच्याकडे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता संचालनालयाच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर डॉ. कविता गुप्ता यांची 'सीकॉम'च्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर ए. बी धुलज यांची कर्मचारी राज्य विमा योजना आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्यातील अन्य काही आयएसआय अधिकाऱ्यांच्या बदल्या खालीलप्रमाणे : -

डॉ. एच. यशोद : आयुक्तपद, महिला आणि बालविकास 

डॉ. बी. एन. पाटील : संचालकपद, पर्यावरण विभागाच्या 

एम. जे. प्रदीप चंद्रन : उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग (माहिती-तंत्रज्ञान)

अनुप कुमार यादव : संचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन आणि आयुक्त (कुटुंब कल्याण)

परिमल सिंह : आयुक्तपद, विशेष विक्रीकर 

ई. रवेंद्रन : सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT