12 mlas appointed governor legislative council dispute in court thackeray government eknath shinde supreme court bhagat singh koshyari sakal
महाराष्ट्र बातम्या

विधान परिषदेवर नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न उच्च न्यायालयात; राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका

महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा जणांच्या नावाची शिफारस राज्यपालांना केली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने दिलेली राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नावे रद्दबातल करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा जणांच्या नावाची शिफारस राज्यपालांना केली होती. यामध्ये साहित्य, शैक्षणिक, संशोधन, कलाकार अशा विविध क्षेत्रांतील गुणी व्यक्तींचा समावेश होता. मात्र राज्यपालांनी वर्ष होऊनही यावर निर्णय घेतला नाही. तसेच संबंधित यादी प्रलंबित ठेवली. आता राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. अशा वेळी पुन्हा नव्याने ही यादी तयार करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेला ॲड. नितीन सातपुते यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

राज्यपालांनी पहिल्या बारा जणांची यादी पूर्ववत ठेवावी, नवीन यादी करण्यासाठी शिंदे सरकारला मनाई करावी, इत्यादी मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत याचिका प्रलंबित आहेत, तसेच घटनापीठाकडे संबंधित मुद्यांवर सुनावणी प्रलंबित आहे. अशावेळी अन्य कोणतेही निर्णय घेण्यासाठी शिंदे सरकारला मनाई करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेवर नियमित न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञ समिती नियुक्त करावी!

शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयांची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करावी, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. याचिकेवर नियमित न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हार्दिक पांड्या-माहिका शर्मा दिवाळी सेलिब्रेशनसाठी केलं 'मॅचिंग मॅचिंग'; रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण

Diwali Celebration : वसई विरार मध्ये शिवरायांच्या किल्ल्याचे दर्शन; ठीक ठिकाणी उभारण्यात आले आहेत इतिहास कालीन किल्ले

Karad News : कऱ्हाड दक्षिणमधील ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील यांचे निधन

Balipratipada and Padwa 2025: बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा एकाच दिवशी का साजरा करतात? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Fursungi Nagar Parishad Election : फुरसुंगी नगरपरिषद निवडणुकीसाठी महापालिकेचे ३५ कर्मचारी नियुक्त

SCROLL FOR NEXT