Minor Girl missing sakal
महाराष्ट्र बातम्या

२२ महिन्यांत सोलापुरातील १२४ अल्पवयीन मुलींचे अपहरण! एका तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेले अन्‌ ५० दिवसांत दीड लाख खर्च केले; पोलिसांनी अमृतसरमधून रेल्वे, विमानातून आणले

विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील एका गावातील १७ वर्षांची मुलगी प्रेमाच्या आमिषातून तरुणासोबत पळून गेली होती. १२ सप्टेंबर रोजी दोघेही रेल्वेने पुणे-मुंबईला गेले. त्यानंतर आपल्याला पोलिस पकडतील म्हणून पुढे अमृतसरला गेले. पण, विजापूर नाका पोलिसांनी त्यांना शोधलेच.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील एका गावातील १७ वर्षांची मुलगी प्रेमाच्या आमिषातून तरुणासोबत पळून गेली होती. १२ सप्टेंबर रोजी दोघेही रेल्वेने पुणे-मुंबईला गेले. त्यानंतर आपल्याला पोलिस पकडतील म्हणून पुढे अमृतसरला गेले. पोलिसांना सापडू नये म्हणून ५० दिवसांत त्या तरुणाने तब्बल दीड लाख रुपये खर्च केले. पण, विजापूर नाका पोलिसांनी त्यांना शोधलेच. बुधवारी त्यांना रेल्वे, विमानातून सोलापुरात आणले आहे.

मोबाईलचा (सोशल मीडिया) अतिवापर, मित्रसंगत, प्रेम, आकर्षण, पालक-मुलांमधील विसंवाद अशा प्रमुख बाबींमधून मुले-मुली, तरुणी पळून जाण्याचे प्रमाण मागील सहा-सात वर्षांत वाढले आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण, तरुणी, महिला बेपत्ता होण्याचे सरासरी प्रमाण दरवर्षी ३०० हून अधिक आहे. पालकांच्या तक्रारीनंतर त्यांना शोधण्यात पोलिसांचा वेळ व लाखो रुपयांचा खर्च होतो. अनेकदा पोलिस त्या मुलींना शोधतात, पण काही महिन्यात त्या पुन्हा पळून जातात, अशीही उदाहरणे आहेत.

सोलापूर शहरात मागील २२ महिन्यांत १३४ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. त्यातील दहा मुली अजूनही सापडलेल्या नाहीत. मुलीचे प्रेमप्रकरण सुरू असताना आई-वडिलांनी लग्न जमविण्याचा प्रयत्न केला की त्या पळून जातात, अशीही उदाहरणे त्यात आहेत. त्या मुलींना बालकल्याण समितीसमोर उभे करून त्यांचे समुपदेशन करून त्यांना पालकांच्या ताब्यात दिले जाते. तर अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल होतो. मागील दोन वर्षांत १२४ तरुणांविरुद्ध असा गुन्हा दाखल झाला आहे.

सन मुलींचे अपहरण सापडलेल्या मुली

२०२४ ६८ ६४

२०२५ ६६ ६०

एकूण १३४ १२४

...तर बरबाद होईल अख्खे आयुष्य

अल्पवयीन मुलगी किंवा मुलावर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात संबंधित आरोपीविरुद्ध लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ नुसार गुन्हा दाखल होतो. या गुन्ह्यात आरोपीला कठोर कारवाईला सामोरे जावे लागते. असा एखादा गुन्हा दाखल झाला की यातून शक्यतो सुटका होत नाही. न्यायालयातून आरोपीला कठोर शिक्षा होते. त्यामुळे अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यापूर्वी तरुणांनी या बाबीचा गांभीर्याने विचार करावा. पालकांनीही मुलांसोबत सुसंवाद ठेवावा, असे आवाहन महिला सुरक्षा कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT