croploan 
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी ! 14 जिल्हा बॅंकांचा कर्जवाटपात हात आखडताच; कोणत्या बॅंकेला किती उद्दिष्टे जाणून घ्या...

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनामुळे शेतमाल बांधावर फेकून देणाऱ्या बळीराजाला बॅंकांनी उद्दिष्टानुसार कर्जवाटप करावे. कर्जमाफीस पात्र असतानाही लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जवाटप करावे आणि ती रक्‍कम सरकारकडे येणेबाकी म्हणून दाखवावी, असे राज्य सरकारने स्पष्ट केले. तरीही राज्यातील 14 जिल्हा बॅंकांनी हात आखडता घेतला असून त्यांनी उद्दिष्टाच्या 40 टक्‍केदेखील कर्जवाटप केले नसल्याचे समोर आले आहे.


राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने पुणे विभागातील चार जिल्हा बॅंकांना चार हजार 186 कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्टे दिले आहे. तर कोल्हापूर विभागातील चार जिल्हा बॅंकांना एक हजार 678 कोटींचे, नांदेड विभागातील तीन बॅंकांना एक हजार 241 कोटींचे, नाशिक विभागातील पाच जिल्हा बॅंकांना दोन हजार 43 कोटींचे, औरंगाबाद विभागातील पाच जिल्हा बॅंकांना 927 कोटींचे आणि नागपूर विभागातील आठ जिल्हा बॅंकांना तीन हजार 230 कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्टे दिले आहे. त्यापैकी 15 जिल्हा बॅंकांचे कर्जवाटप उद्दिष्टानुसार सुरु आहे. त्यामध्ये कोल्हापूर अव्वल असून पुणे जिल्हा बॅंक दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बुलढाणा, यवतमाळ, गोंदिया, लातूर, परभणी, उस्मानाबाद, धुळे, सातारा, सोलापूर या जिल्हा बॅंकांचे कर्जवाटप उद्दिष्टाच्या 45 ते 55 टक्‍क्‍यांपर्यंत झाले आहे.

राज्यातील 14 जिल्हा बॅंकांचे वाटप 40 टक्‍क्‍यांपेक्षा कमी
लॉकडाउनमुळे हतबल झालेल्या बळीराजाला बॅंकांनी उद्दिष्टानुसार कर्जवाटप करावे, कोरोनामुळे कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्यांना कर्ज देऊन त्यांची रक्‍कम सरकारकडे येणेबाकी दाखवावी, असे राज्य सरकारने स्पष्ट केले. मात्र, राज्यातील नगर, जळगाव, नाशिक, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, औरंगाबाद, जालना, बीड, अकोला, अमरावती, गडचिरोली, नागपूर या 14 जिल्हा बॅंकांचे कर्जवाटप 40 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. तर काही बॅंकांनी तर उद्दिष्टाच्या 15 टक्‍केदेखील कर्जवाटप केले नसल्याचे समोर आले आहे.
 

जिल्हा बॅंकनिहाय कर्जवाटपाचे उद्दिष्टे

  • नगर : 1,498 कोटी
  • पुणे : 1,433 कोटी
  • सातारा : 1,100 कोटी
  • जळगाव : 1,094 कोटी
  • अकोला : 1,060 कोटी
  • सोलापूर : 155 कोटी
  • कोल्हापूर : 686 कोटी
  • सांगली : 832 कोटी
  • रत्नागिरी : 55 कोटी
  • सिंधुदूर्ग : 105 कोटी
  • नांदेड : 186 कोटी
  • लातूर : 740 कोटी
  • परभणी : 315 कोटी
  • धुळे : 221 कोटी
  • नाशिक : 437 कोटी
  • रायगड : 110 कोटी
  • ठाणे : 181 कोटी
  • औरंगाबाद : 411 कोटी
  • जालना : 91 कोटी
  • बीड : 100 कोटी
  • उस्मानाबाद : 259 कोटी
  • बुलढाणा : 66 कोटी
  • अमरावती : 528 कोटी
  • भंडारा : 260 कोटी
  • चंद्रपूर : 545 कोटी
  • गडचिरोली : 61 कोटी
  • गोंदिया : 137 कोटी
  • नागपूर : 91 कोटी
  • यवतमाळ : 548 कोटी
  •  

एकाही बॅंकेने राज्य बॅंकेकडे कर्जाची मागणी केलेली नाही
राज्य स्तरीय बॅंकर्स कमिटीच्या उद्दिष्टानुसार राज्यातील 29 जिल्हा बॅंकांना 13 हजार 305 कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्टे दिले आहे. राज्य सहकारी बॅंकेतर्फेही जिल्हा बॅंकांना कर्जवाटपासाठी अर्थसहाय केले जाते. मात्र, यंदा कर्जमाफीचे बरेच पैसे जिल्हा बॅंकांना आल्याने एकाही बॅंकेने राज्य बॅंकेकडे कर्जाची मागणी केलेली नाही.
- डॉ. ए. आर. देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT