2000 notes sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरकरांकडे निघाल्या २०००च्या १४ लाख नोटा! ७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील बॅंकांमध्ये २८०.८० कोटी रुपये जमा

व्यवहारातून २ हजारांची नोट कायमची बंद झाली आहे. पूर्वीही व्यवहारात न दिसणारी २ हजाराची नोंद बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर ७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील बॅंक ऑफ इंडिया व स्टेट बॅंकेच्या ट्रेझरीत तब्बल १४ लाख तीन हजार (२८०.७० कोटी रुपये) नोटा जमा झाल्या आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : व्यवहारातून दोन हजारांची नोट कायमची बंद झाली आहे. पूर्वीही व्यवहारात न दिसणारी दोन हजाराची नोंद बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर ७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील बॅंक ऑफ इंडिया व स्टेट बॅंकेच्या ट्रेझरी शाखेत तब्बल १४ लाख तीन हजार (२८०.७० कोटी रुपये) नोटा जमा झाल्या आहेत.

नोटाबंदीनंतर दोन हजाराची नोट चलनात आली, पण काही महिन्यांनी ही नोट व्यवहारातून गायबच झाली, अशी स्थिती होती. या पार्श्वभूमीवर ‘आरबीआय’ने व्यवहारातील दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला. पण, बॅंकेच्या ग्राहकांकडील नोटा जमा करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.

मुदतीनंतरही कोणाकडे नोटा राहिल्या असल्यास त्यांना पुन्हा सात दिवसांची वाढीव (७ ऑक्टोबरपर्यंत) मुदत देण्यात आली होती. दरम्यान, ३० सप्टेंबरपर्यंत सोलापूरच्या बॅंक ऑफ इंडिया व स्टेट बॅंकेच्या ट्रेझरी शाखेत २७९ कोटी ९४ लाख रुपयांच्या नोटा जमा झाल्या होत्या. मुदतवाढीनंतर बॅंक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखेत ३० लाखांच्या नोटा जमा झाल्या असून स्टेट बॅंकेतही काही नोटा जमा झाल्या आहेत. आता दोन हजाराची नोट चलनातून म्हणजेच व्यवहारात चालणार नाही. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही बॅंकेत दोन हजाराची नोट स्वीकारली जाणार नाही. ‘आरबीआय’ने दिलेली सात दिवसांची मुदत आता संपुष्टात आली आहे.

सात दिवसांत ४० लाखांच्या नोटा जमा

३० सप्टेंबरच्या मुदतीत जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील तब्बल १४ लाख तीन हजार नोटा बॅंकांमध्ये जमा केल्या. पण, काही जणांकडे अजूनही नोटा शिल्लक असतील हे गृहीत धरून पुन्हा सात दिवसांची मुदत देण्यात आली. या काळात बॅंक ऑफ इंडियात ३० लाख तर अन्य बॅंकांमध्ये अंदाजे १० लाखांच्या नोटा जमा झाल्या आहेत. आता नोटा जमा करण्यासाठी ‘आरबीआय’च्या मुंबई किंवा नागपूर येथील (एका व्यक्तीला एका दिवसात केवळ दहा नोटा) शाखेतच जमा कराव्या लागणार आहेत.

व्यवहारातून आता दोन हजाराची नोट बंद

दोन हजाराची नोट आता चलनात चालणार नाही. पण ज्यांच्याकडे अजूनही दोन हजाराच्या नोटा आहेत, त्यांना ‘आरबीआय’च्या नागपूर व मुंबईतील शाखेत जमा करता येणार आहेत. त्याठिकाणी अद्याप नोटा न स्वीकारण्याची मुदत निश्‍चित झालेली नाही.

- प्रशांत नाशिककर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेसाठी गोपीचंद पडळकर मैदानात, जयंत पाटलांविरोधात फुकले रणशिंग

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT