cash sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरातील २ ‘सीएं’ची दीड कोटींची फसवणूक! पनाश अपार्टमेंटमध्ये एका वर्षात फ्लॅट देतो म्हटले, पण घरही दिले नाही अन्‌ पैसेही लंपास; अमित थेपडेंसह ६ जणांवर गुन्हे

विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये एका वर्षात फ्लॅटचा ताबा देतो म्हणून कोट्यवधी रुपये घेऊनही अनेकांना घरे दिली गेली नाहीत. मागील तीन महिन्यांत अशा आठ जणांनी शहर पोलिसांत धाव घेतली आहे. आता दोन चार्टर्ड अकाउंटंटनी विजापूर नाका पोलिसांत अशाच फिर्यादी दिल्या आहेत. त्यांचीही तब्बल दीड कोटींची फसवणूक झाली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये एका वर्षात फ्लॅटचा ताबा देतो म्हणून कोट्यवधी रुपये घेऊनही अनेकांना घरे दिली गेली नाहीत. मागील तीन महिन्यांत अशा आठ जणांनी शहर पोलिसांत धाव घेतली आहे. आता दोन चार्टर्ड अकाउंटंटनी विजापूर नाका पोलिसांत अशाच फिर्यादी दिल्या आहेत. त्यांचीही तब्बल दीड कोटींची फसवणूक झाली आहे.

चार्टर्ड अकाउंटंट चेतन नंदकिशोर नोगजा (रा. वामन नगर, जुळे सोलापूर) यांच्या फिर्यादीनुसार, माझ्या लहान भावाने मे. गॅलोर डेव्हलपर्सच्या विजयपूर रोडवरील गॅलेक्सी पनाशमध्ये २०२० मध्ये ए-२, ४०१ हा फ्लॅट घेतला असून तो भाडेतत्त्वावर दिला होता. मलाही तेथे फ्लॅट घ्यायचा असल्याने गॅलेक्सी पनाश अपार्टमेंटच्या कार्यालयात जाऊन डिसेंबर २०२० मध्ये चौकशी केली. त्यावेळी सागर शहा याच्याशी ओळख झाली. त्यांनी मला प्रोजेक्टची माहिती दिली. प्रोजेक्ट आवडल्याने मोनाली व अमित थेपडे यांची भेट घेतली. त्यावेळी ए-२ मधील १३०५ क्रमांकाचा टू-बीएचके फ्लॅट घेण्याचे ठरविले आणि त्यासाठी ४४ लाख ४६ हजार रुपये द्यायचे ठरले. त्यापैकी ३० लाख रुपये होम लोनद्वारे दिले. उर्वरित सहा लाख ८८ हजार रुपये आई सुशीला नंदकिशोर नोगजा यांच्या बँक खात्यातून पाठविले. त्यावरील स्टॅम्प ड्युटीचे दोन लाख ५८ हजार रुपये मी दिले. असे एकूण ३९ लाख ४६ हजार रुपये त्यांना दिले. त्याचा ॲग्रीमेंट टू सेल व्यवहार २७ डिसेंबर २०२१ रोजी झाला.

एक वर्षात फ्लॅट देण्याचे मान्य करूनही फ्लॅटचा ताबा दिला नाही. तत्पूर्वी, तेथील बी-विंगमधील १४०४ क्रमांकाच्या दुसऱ्या फ्लॅटसाठी ७० लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी ४५ लाख ७७ हजार रुपये होम लोनद्वारे दिले. दहा लाख रुपये पत्नीच्या खात्यातून पाठविले. स्टॅम्प ड्युटीचे तीन लाख ९० हजार रुपये मी दिले. असे एकूण ६५ लाख ६७ हजार रुपये दिले. १८ जानेवारी २०२२ रोजी हा व्यवहार झाला. त्या फ्लॅटचाही ताबा अद्याप दिलेला नाही. मोनाली थेपडे, दीपक गुगले, शीतल देशमुखे, अमित थेपडे, सागर शहा, शंकर लोंढे यांनी एक कोटी पाच लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केली. दोन्ही फ्लॅटसाठी लागणाऱ्या ‘डीएचएफएल’ कंपनीची एनओसी बनावट देऊन दोन्ही फ्लॅटचा ताबा दिला नाही, असेही फिर्यादीत नमूद आहे.

दुसऱ्या चार्टर्ड अकाउंटंटचीही फिर्याद

चार्टर्ड अकाउंटंट सचिन अशोक कट्टे (रा. राघवेंद्र नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांनीही पनाश अपार्टमेंटमधील बी-विंगमधील १२०३ क्रमांकाचा फ्लॅट घेण्यासाठी ५२ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद विजापूर नाका पोलिसांत दिली आहे. त्यावरून मोनाली थेपडे, दीपक गुगले, शीतल देशमुखे, अमित थेपडे, शंकर लोंढे व सागर शहा यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Breakfast Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी; १५ मिनिटांत बनवा मऊ, स्पंजी उपवासाची इडली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT