Social Media 
महाराष्ट्र बातम्या

Coronavirus : राज्यात सोशल मीडियावरील पोस्टप्रकरणी २०० जणांवर गुन्हे दाखल

सकाळवृत्तसेवा

पुणे - लॉकडाउन सुरू असतानाही सोशल मीडियावर कोरोना किंवा अन्य विषयांबाबत खोट्या बातम्या, चुकीची माहिती व अफवा पसरविण्याची खुमखुमी काही कमी होण्याचे चिन्हे दिसेनात. अशी खुमखुमी असणाऱ्यांविरूद्ध महाराष्ट्र सायबरने कंबर कसली आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे २०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये कोरोनाबाबत खोट्या बातम्या, अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध ६८ गुन्हे दाखल असून ३७ जणांना अटक करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने तसेच लॉकडाउनच्या काळात खोटी माहिती रोखण्याचेही पोलिसांपुढे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबर विभागाने सोशल मीडियावर खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सायबर पोलिसांनी आतापर्यंत सोशल मिडियाशी संबंधित विविध कारणांनी १९६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तसेच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ३७ जणांना अटक केली आहे. खोट्या बातम्या, अफवा  पसरविणाऱ्यांचा शोधही पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच एकूण नोंदविलेल्या प्रकरणामध्ये ८८ प्रकरणे सोशल मीडियावर द्वेषयुक्त भाषण पसरविण्याशी संबंधित आहेत.

आकडेवारी
१८२ - खोट्या बातम्या, अफवा प्रकरणी दाखल गुन्हे
८८ -  द्वेषयुक्त भाषणाची प्रकरणे 
३७ - अटक करण्यात आलेले आरोपी
११४ - अद्याप ओळख न पटलेल्या आरोपींची संख्या
३२ - इंटरनेटवरून काढलेल्या वादग्रस्त पोस्ट

अशी घ्यावी खबरदारी
आलेली माहिती, व्हिडिओ, बातम्या पुढे पाठविताना सत्यता पडताळा.
खोट्या बातम्या, चुकीची माहिती, अफवा न पसरविता त्याची साखळी तोडा.
खोटी माहिती अफवा पसरविणाऱ्यांना समज द्या.
फेक मेसेज, व्हिडीओ, माहितीबाबत तत्काळ पोलिसाना माहिती द्या.

सोशल मीडियावर खोट्या बातम्या, चुकीची माहिती, अफवा पसरविणे हा कायद्याने गुन्हा आहे. समाजात चुकीचा संदेश जाऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्‍यता होती, त्यामुळेच अशा वापरकर्त्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने थेट कारवाईला सुरुवात केली आहे. 
- डॉ. बालासिंग राजपूत, पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र सायबर पोलिस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Opening Ceremony: आयपीएलचा उद्घाटन सोहळा होणार नाही, 'त्या' ११ जणांसाठी घेतला निर्णय; निरोप समारंभ मात्र दणक्यात...

Latest Marathi News Live Update : रामनवमीच्या दिवशी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा 23 वा उत्सव

'ट्रम्पजी, मला LPG सिलिंडर पाठवा!' बोमन ईरानींची व्हिडिओद्वारे ट्रम्प यांच्याकडे मागणी, म्हणाले,'कस्टर्ड, धनसक खाऊ घालतो पण...'

Income Tax Alert: 31 मार्चपूर्वी ही 4 कामे नक्की करा! नाहीतर करसवलतही नाही वर मोठा दंड आणि व्याजही भरावे लागेल

Pimpri Chinchwad News: ‘भामा आसखेड’बाबत दिरंगाई नको; पिंपरी महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी!

SCROLL FOR NEXT