copy free exam educational board new pattern practical and written exam squad
copy free exam educational board new pattern practical and written exam squad esakal
महाराष्ट्र

कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्यात ३ भरारी पथके! सोलापूर जिल्ह्यात ४२ भरारी अन्‌ ३०० बैठे पथके; स्मिता पाटलांकडे ‘माध्यमिक’ची धुरा

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून (बुधवारी) सुरू होत आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल २८ पथके नेमली आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या १६ तर दहावीच्या १४ संवेदनशील केंद्रांवर देखील महसूलचेच बैठे पथक असणार आहे.

जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या ६५ हजार ७४९ विद्यार्थ्यांसाठी १८२ केंद्रे असणार आहेत. दुसरीकडे इयत्ता बारावीतील ५२ हजार ८७० विद्यार्थ्यांसाठी ११८ परीक्षा केंद्रे असणार आहेत. यंदा सरमिसळ पद्धत असल्याने परीक्षा केंद्रात वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दोन दिवसापूर्वी परीक्षेसंदर्भातील आढावा बैठक घेतली. त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ठोस नियोजन करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण विभागाला देण्यात आल्या. मात्र, माध्यमिक शिक्षणाधिकारी सध्या रजेवर असून ते मंगळवारी हजर होणार आहेत. पण, बुधवारपासून परीक्षा सुरू होणार असल्याने शिक्षण विभागाच्या भरारी पथकांचे नियोजन अर्धवटच आहे.

गतवर्षी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून १४ भरारी पथके नेमली होती. त्यात समाजकल्याण अधिकारी, माध्यमिक, योजना व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, बांधकामसह बहुतेक विभागांचे कार्यकारी अभियंता देखील या पथकांमध्ये असतात. मात्र, जिल्हा परिषदेची पथके अजूनपर्यंत अंतिम झाली नसल्याचे सांगण्यात आले. आता माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके रजेवर येईपर्यंत या विभागाची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे सोपविली जाणार आहे.

प्रत्येक तालुक्यासाठी ‘महसूल’चे पथक

दहावी व बारावीची परीक्षा संपेपर्यंत प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली एक भरारी पथक नेमण्यात आले आहे. त्याशिवाय प्रत्येक तालुक्यासाठी पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांचेही पथक असणार आहे. तसेच प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मराठी, इंग्रजी व गणित या विषयांसाठी विशेष पथकांची देखील नेमणूक करण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली.

संवेदनशील केंद्रांवर ३ तास बैठे पथक

जिल्ह्यात दहावीची १४ तर इयत्ता बारावीची १६ संवेदनशील परीक्षा केंद्रे आहेत. त्या प्रत्येक केंद्रावर महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे बैठे पथक नेमण्यात आले आहे. त्याशिवाय अन्य परीक्षा केंद्रांवर माध्यमिक शिक्षण विभागाकडून बैठे पथकांची नेमणूक केली जाणार आहे. पण, शिक्षणाधिकारी रजेवर असल्याने त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण झालेली नाही. उद्या (शुक्रवारी) प्रभारी शिक्षणाधिकारी परीक्षेतील भरारी पथकाची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT