teacher transfer esakal
महाराष्ट्र बातम्या

ZP Teachers Transfer : राज्यातील 'झेडपी'च्या ४ हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

राज्याच्या ग्रामविकास विभागाने शनिवारी (ता.३०) राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे चार हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्याच्या ग्रामविकास विभागाने शनिवारी (ता.३०) राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे चार हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या केल्या आहेत. या सर्वांना आपापल्या स्व:जिल्ह्यात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून परजिल्ह्यात नोकरी करणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना रात्री उशिरा बदली आदेश ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात आला आहे. मात्र बदली आदेश मिळाला असला तरी या शिक्षकांना चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत सध्या कार्यरत असलेल्या शाळांवरच काम करावे लागणार आहे.

या बदल्यांसाठी प्रहार शिक्षक संघटनेच्या सातत्याने प्रयत्न केले जात होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर आज यश आले आहे. यंदा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधून मिळून सुमारे १५ हजार शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केले होते. यापैकी ११ हजार शिक्षकांना मात्र किमान आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

या बदली प्रक्रियेत साखळी पद्धतीने रिक्त होणाऱ्या संभाव्य जागा आणि सध्या रिक्त असलेल्या या दोन्ही प्रकारच्या जागेवरून शिक्षकांना नव्या नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.

'लवकरच प्रतीक्षा यादी जाहीर होणार'

या टप्प्यात ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत, अशा सर्व पात्र शिक्षकांची संभाव्य बदल्यांसाठीची प्रतीक्षा यादी कायम ठेवली जाणार आहे. यामुळे जसजशा जागा रिक्त होतील, तसतसे प्रतिक्षा यादीतील क्रमानुसार बदली आदेश दिले जाणार आहेत.मात्र सध्या तरी आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना नवीन अर्ज करण्यास संधी मिळणार नसल्याचे प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT