Book-Weight
Book-Weight 
महाराष्ट्र

पाच हजार विद्यार्थ्यांवरच ओझे

संजय मिस्कीन

मुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला सुमारे चार लाखांवर विद्यार्थ्यांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा अधिक ‘शिक्षणाचा भार’ कायम आहे. देशाचा आधारस्तंभ ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाठीचा कणा वाकडा होण्याची सरकार वाट बघत नाही ना, असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे.

शिक्षण विभागाने राज्यातील २३ हजार ४४३ शाळांमधील सुमारे ४ लाख १७ हजार ८९३ विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली असता मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, सांगली, नाशिक, नंदुरबार, धुळे, अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशीम, लातूर, जालना, हिंगोली या पंधरा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर मानकाप्रमाणे दप्तराचे वजन असल्याचे पाहणीत आढळले. म्हणजे उर्वरित सव्वीस जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचा अतिरिक्त बोजा आहे, हे शिक्षण विभागानेच मान्य केले आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनास सादर केलेल्या अहवालात राज्यातील फक्त ५ हजार १४१ विद्यार्थ्यांच्याच पाठीवर दप्तराचे ओझे जास्त वजनाचे असल्याचे नमूद करून आपल्याच विभागाचा ‘विनोद’ केला असल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.

दप्तरातील अवास्तव शैक्षणिक सामग्रीचा अट्टहास विद्यार्थ्यांचे कंबरडे मोडणारा ठरतोय. दप्तरात पाहिल्यास मूळ सहा विषयांव्यतिरिक्त अन्य अनावश्‍यक बाबी दिसतात. पाण्याची बाटली व डब्याचे सुमारे अर्धा-पाऊण किलो वजन वेगळे. दप्तराचे ओझे, हे विद्यार्थ्यांच्या शाळेला दांडी मारण्याचे पर्यायाने विद्यार्थी गळतीचे एक कारण असल्याचे निरीक्षण बालमानस आणि शिक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

या जिल्ह्यांत आढळले दप्तराचे योग्य वजन
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, सांगली, नाशिक, नंदुरबार, धुळे, अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशीम, लातूर, जालना, हिंगोली

शिक्षण विभागाची पाहणी
२३४४३ शाळा
४,१७,८९३ एकूण विद्यार्थी
५१४१ दप्तराचा बोजा वाहणारे विद्यार्थी

शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचा भार केवळ कागदावरच कमी करण्याच्या बाता न करता, ओझे कमी करण्याची संबंधित यंत्रणेला सक्ती करून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी चालविलेला जिवघेणा खेळ थांबवावा.
- रवींद्रकुमार जाधव, बालमानस व सामाजिक समस्या विश्‍लेषक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT