Voting-Machine
Voting-Machine 
महाराष्ट्र

654 ग्रामपंचायतींसाठी 27 मे रोजी मतदान

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 7 ते 12 मे 2018 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी 14 मे 2018 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 16 मे 2018 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्हवाटप होईल. मतदान 27 मे 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 28 मे 2018 रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या -ठाणे- 5, पालघर- 3, रायगड- 187, सिंधुदुर्ग- 2, नाशिक- 20, धुळे- 7, जळगाव- 8, अहमदनगर- 77, पुणे- 90, सोलापूर- 3, सातारा- 23, सांगली- 82, कोल्हापूर- 74, औरंगाबाद- 4, बीड- 2, नांदेड- 7, परभणी- 1, उस्मानाबाद- 3, लातूर- 5, अकोला- 2, यवतमाळ- 29, वर्धा- 14, भंडारा- 4 आणि गडचिरोली- 2. एकूण- 654.

पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्तपदांची जिल्हानिहाय संख्या (कंसात ग्रामपंचायतींची संख्या) - ठाणे (90) - 167, पालघर (73)- 144, रायगड (93)- 158, रत्नगिरी (202)- 299, सिंधुदुर्ग (74)- 104, नाशिक (200)- 318, धुळे (34)- 49, जळगाव (57)- 96, नंदुरबार (32)- 36, अहमदनगर (78)- 124, पुणे (258)- 456, सोलापूर (93)- 154, सातारा (409)- 777, सांगली (40)- 81, कोल्हापूर (87)- 126, औरंगाबाद (34)- 41, बीड (24)- 35, नांदेड (106)- 177, परभणी (28)- 40, उस्मानाबाद (48)- 65, जालना (21)- 28, लातूर (79)- 94, हिंगोली (41)- 55, अमरावती (80)- 121, अकोला (23)- 31, यवतमाळ (110)- 167, वाशीम (20)- 23, बुलडाणा (39)- 72, वर्धा (49)- 72, चंद्रपूर (74)- 106, भंडारा (6)- 48, गोंदिया (35)- 43 आणि गडचिरोली (175)- 464. एकूण (2,812)- 4,771.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT