solapur city bus sakal
महाराष्ट्र बातम्या

14 वर्षे जुन्या ‘एसएमटी’तून दररोज 2000 शालेय मुलींसह 7000 प्रवाशांचा प्रवास! नोव्हेंबरमध्ये सोलापुरातून धावणार केंद्र सरकारच्या नव्या इलेक्ट्रिक बस

सोलापूर महापालिकेचा परिवहन उपक्रम पूर्णतः मोडकळीस आला असून, १३ ते १४ वर्षांपूर्वीच्या १९ जुनाट बसगाड्यांना डागडुजी करून सध्या शहरात धावत आहेत. दररोज या बसमधून दोन हजार शालेय मुली आणि पाच हजार अन्य प्रवासी प्रवास करतात.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर महापालिकेचा परिवहन उपक्रम पूर्णतः मोडकळीस आला असून, १३ ते १४ वर्षांपूर्वीच्या १९ जुनाट बसगाड्यांना डागडुजी करून सध्या शहरात धावत आहेत. दररोज या बसमधून दोन हजार शालेय मुली आणि पाच हजार अन्य प्रवासी प्रवास करतात. शहरातून धावणाऱ्या ॲटोरिक्षांच्या तुलनेत महापालिकेच्या परिवहन उपक्रमाकडील बसगाड्यांची संख्या एक टक्कासुद्धा नाही.

‘पीएम-ई बस सेवा’ योजनेअंतर्गत मोठ्या शहरांमधील प्रवासी वाहतुकीसाठी सोलापूर महापालिकेला १०० इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. शहरात सध्या ३० हजारांहून अधिक ॲटोरिक्षातून दररोज तीन ते पाच लाख प्रवासी ये-जा करतात. दुसरीकडे मात्र, महापालिकेच्या परिवहन उपक्रमाकडे बस कमी असल्याने दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या सात हजारांपर्यंतच आहे. ही स्थिती बदलण्यासाठी महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांनी पुढाकार घेतला असून, सम्राट चौक परिसरातील चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऑक्टोबरअखेर सर्व काम संपवून नोव्हेंबरपासून किमान ३० बसगाड्या शहरातून धावतील, असे नियोजन केले आहे. दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीत आयुक्तांनी त्यासंबंधीचा आढावा घेतला आहे.

अडीच-तीन महिन्यात पूर्ण होईल काम

केंद्र सरकारकडून सोलापूर महापालिकेला १०० इलेक्ट्रिक बस मिळणार असून, नोव्हेंबरपासून त्या बस शहरातील रस्त्यावरून धावतील, असे नियोजन आहे. त्यादृष्टीने महावितरणकडून चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मक्तेदाराचे सर्व साहित्य आले असून अडीच-तीन महिन्यांत काम पूर्ण होईल.

- आर. सी. पाटील, कार्यकारी अभियंता, महावितरण, सोलापूर

महापालिकेच्या परिवहनची सद्य:स्थिती

  • एकूण बस

  • १९

  • बसगाड्यांचे आयुर्मान

  • १३ ते १४ वर्षे

  • दररोजचे प्रवासी

  • ७०००

  • एकूण खेपा

  • ११२

  • दररोजचे सरासरी उत्पन्न

  • १ लाख रुपये

‘परिवहन’ला दररोज १५ हजारांचा नफा

महापालिकेच्या परिवहन विभागाकडून एकेकाळी १०० बसगाड्यांच्या माध्यमातून दररोज २५ लाखांहून अधिक उत्पन्न मिळविले जायचे. सध्‍या याला उतरती कळा लागली असून, आता रोजचा सरासरी १५ हजार रुपयांवर नफा आला आहे. सध्या १९ खटारा बसगाड्या ग्रामीणमधील १५ तर शहरातील चार मार्गावर धावतात. ११२ फेऱ्यांपैकी ३४ फेऱ्या या शालेय मुलींसाठी केल्‍या जातात. यामुळे दोन हजार शालेय विद्यार्थिनी परिवहनच्या बसगाड्यांमधून प्रवास करतात, त्यातून परिवहन उपक्रमास दरमहा आठ लाख रुपये मिळतात, अशी सद्य:स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग! ७ नोव्हेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन

Latest Marathi News Live Update : मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु

Video: 'फक्त ७ तास...' टीम इंडियाच्या खऱ्या कबीर खानचा फायनलआधी स्पेशल मेसेज अन् विश्वविजयानंतर रोहितप्रमाणे मैदानात रोवला तिरंगा

Cancer Love Horoscope: कर्क राशीच्या प्रेम जीवनात आज काय खास घडणार? वाचा तुमचं राशिभविष्य

SCROLL FOR NEXT