Solapur News sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल ८००० उच्चांकी दर! शेतकऱ्यांना यंदा मिळणार घामाचा दाम

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दरामध्ये मोठी सुधारणा झाली. आज (शुक्रवार) कांद्याचे दर प्रतिक्विंटल आठ हजार रुपयांपर्यंत पोचले. सरासरी दर मात्र चार हजार रुपये प्रतिक्विंटल इतकाच आहे.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दरामध्ये मोठी सुधारणा झाली. आज (शुक्रवार) कांद्याचे दर प्रतिक्विंटल आठ हजार रुपयांपर्यंत पोचले. सरासरी दर मात्र चार हजार रुपये प्रतिक्विंटल इतकाच आहे. मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली आहे.

शुक्रवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावामध्ये कांद्याला चालू हंगामातील विक्रमी दर मिळाला आहे. आठ हजार रुपये प्रति क्विंटल इतक्या कमाल दाराने कांदा विक्री झाला आहे. सरासरी दर मात्र तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल इतकाच आहे. दक्षिण भारतात कांद्याची वाढलेली मागणी व कांदा आवक मध्ये झालेली घट याचा परिणाम दरावर झाल्याची माहिती बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली आहे. सध्या बाजारात साठवलेल्या कांद्यासोबतच नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. नवीन कांद्यालाही समाधानकारक भाव मिळत आहे. यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामात अपेक्षित कांदा लागवड झाली नाही.

मोहोळ, करमाळा, माढा, बार्शी, अक्कलकोट, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये कांदा लावगड मोठ्या प्रमाणावर होते. कृषी विभागाच्या आकडेवारीवरून जिल्ह्यात यंदा २९ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. परंतु, प्रत्यक्षातील स्थिती वेगळीच आहे. पावसाअभावी जमिनीतील ओल कमी झाल्याने हंगामी क्षेत्रावरील कांद्याने मान टाकली आहे. बागायती जमिनीवर देखील कांदा लागवड कमीच आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात येणारी आवक निम्म्याने कमी आहे. मागील महिन्याच्या तुलनेत तीन-चार दिवसांत कांदा आवक कमी झाली आहे. सरासरी १४० गाड्यांची आवक आता ९५ गाड्यांवर आली आहे. त्या तुलनेत कांद्याची मागणी वाढत असल्याने सरासरी दरात मागील आठवड्याच्या तुलनेत ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

आवक वाढली तरी दरातली सुधारणा कायम

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी १४० ट्रक तर बुधवारी ९५ ट्रक कांद्याची आवक झाली. आवक घटल्यानंतर बुधवारी कांद्याचे दर प्रतिक्विंटल एक हजार रुपये वाढले. गुरुवारी १४९ ट्रक कांद्याची आवक तर शुक्रवारी २०२ ट्रक आवक झाल्यानंतरही दरातील सुधारणा कायम राहिली.

खर्चाच्या तुलनेत दर कमीच

शेतकऱ्यांना एक एकर कांदा लागवडीसाठी व काढून बाजारात विकायला नेईपर्यंत एकरी किमान ६० हजार रुपयांचा खर्च होतो. तीन-साडेतीन महिने मेहनत करून वाढविलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल किमान चार हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्यास शेतकऱ्यांना खर्च जावून दोन पैसे हाती पडतात ही वस्तुस्थिती आहे.

डिसेंबर- जानेवारीत वाढणार आवक

काही दिवसांत आता कर्नाटक सीमेवरील कांदा बाजारात विक्रीसाठी येईल. आता लासलगाव, साक्री, कोल्हापूर, अकोला, मुंबई, धुळे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कांद्याचा भाव थोडा वधारला आहे. सध्या बाजारातील कांद्याची आवक कमी आहे, पण डिसेंबर ते जानेवारीत आवक वाढेल असा विश्वास बाजार समितीतील व्यापारी व अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आवक घटल्याने भावात आणखी सुधारणा होईल

गेल्या दोन वर्षात कांद्याला अपवाद वगळता भाव मिळत नसल्यामुळे यावर्षी नवीन कांद्याची आवक घटली आहे. त्याचबरोबर साठवणूक केलेल्या कांद्याची ही आवक कमी झाली आहे. यामुळे कांद्याच्या दरात येणाऱ्या काळात आणखीन सुधारणा होण्याची शक्यता आहे.

- राजेंद्र पोळ, अडत व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manjari Railway Accident : पुणे-दौंड डेमूच्या धडकेत तीन तरुण जागीच ठार; हडपसर पोलिसांकडून कसून तपास सुरू

Solapur Crime:'बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतून दोघांनी केला चेक लंपास'; पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा..

चोर-पोलिसांचा जुना खेळ संपला !; 'चोरट्यांचा फोन पे, गुगल पेवरून संवाद'; पोलिसांना सापडू नये म्हणून नवी शक्कल?

Latest Marathi Breaking News : नंदुरबारमध्ये शिंदेंना भाजपचा दे धक्का, एकनिष्ठ शिवसैनिकाचा शिवसेनेला रामराम

Pune ATS : एटीएसच्या तपासात झुबेरचे दहशतवादी मनसुबे उघडकीस; सुरक्षा यंत्रणेत खळबळ

SCROLL FOR NEXT