Koyna Dam esakal
महाराष्ट्र बातम्या

Koyna Dam : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' कोयना धरण भरण्यास लागणार उशीर; किती आहे साठा? 'इतकंच' भरलंय धरण

पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

सकाळ डिजिटल टीम

गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे आठ, नवजाला २३ आणि महाबळेश्वरला (Mahabaleshwar) ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ८२.३१ टीएमसी झाला असून, जलाशयात प्रतिसेकंद आठ हजार ९९८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे आठ, नवजाला २३ आणि महाबळेश्वरला (Mahabaleshwar) ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, रविवारी दिवसभरात कधीतरी रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या.

मात्र, काल पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. गेली महिनाभर असणारे ढगाळ वातावरण आज पाहावयास मिळाले नाही. खरिपाच्या पेरण्या झाल्यापासून सातत्याने पाऊस पडत होता.

त्यामुळे खरिपाच्या पिकांची आंतर मशागतीच्या कामांना वेग आला नव्हता. सततच्या पावसाने पिके समाधानकारक स्थितीत नाहीत. मात्र, रविवारपासून पावसाने उघडीप दिल्याने आता खरीप हंगामातील पिकांना योग्य वातावरण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT