85 percent of corona patients have no symptoms Health department Information Dr Nitin Ambadekar solapur  Esakal
महाराष्ट्र बातम्या

कोरोनाचे ८५ टक्के रुग्ण लक्षणांविना - डॉ. नितीन आंबाडेकर

आरोग्य संचालकांची माहिती : लसीकरणामुळे मृत्यूदर घटला

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, कल्याण डोंबिवली आदी मोठ्या शहरांमध्ये कोरोना पुन्हा वाढत असून एकमेकांच्या संपर्कातून लगेचच कोरोनाची बाधा होत आहे. पण, दिलासादायक बाब म्हणजे सध्याच्या नवीन रुग्णांमध्ये ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तर १३ टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून एकूण रुग्णांपैकी केवळ २ टक्के रुग्णांनाच रुग्णालयामध्ये जावे लागत असल्याची माहिती आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांनी दिली.

राज्यात २७ मेपासून काही शहरांमध्ये रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाच्या तिन्ही लाटा येऊन गेल्यानंतर आता राज्य चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. प्रत्येक नागरिकांनी प्रतिबंधित लस घेतली, मास्कचा वापर केल्यास कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि खाटांविना कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. कोरोनाचा मृत्यूदर घटला असून मागील आठ दिवसांत कोरोनामुळे राज्यातील केवळ सहा लोकांचा मृत्यू झाला असून त्यातील बहुतेकजण वयस्क होते.

पावसाळ्याचे दिवस असल्याने रुग्णसंख्या वाढू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. तत्पूर्वी, प्रतिबंधित लसीकरण आणि चाचणी वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यात प्राधान्याने १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. अजूनही राज्यातील एक कोटी विद्यार्थ्यांपैकी ३६ लाख ६३ हजार मुलांनी लशीचा एकही डोस घेतलेला नाही.

सव्वासात कोटी लोक सुरक्षित

राज्यातील १२ ते १४ वयोगटातील ३९ लाख १९ हजारांपैकी साडेनऊ लाख तर १५ ते १८ वयोगटातील ६० लाख ६४ हजारांपैकी २७ लाख ५७ हजार विद्यार्थ्यांनी कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर १८ वर्षांवरील नऊ कोटी १४ लाख ३५ हजारांपैकी सात कोटी व्यक्तींनी दोन्ही डोस घेतले आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या राज्यातील जवळपास सव्वासात कोटी व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असल्याचेही आरोग्य विभागाने नमूद केले आहे.

सध्याच्या एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. १३ टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. राज्यातील काही शहरांमध्ये रुग्ण वाढत असून खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क वापरावा, लसीचे दोन्ही डोस घ्यावेत.

- डॉ. नितीन आंबाडेकर, संचालक, सार्वजनिक आरोग्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT