solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

गावागावातील तरुणांसाठी मोठी संधी! खते-बियाणे व किटकनाशके विक्रीचे केंद्र सुरू करायला काय लागते पात्रता अन्‌ कागदपत्रे? घरबसल्या ऑनलाइन मिळतो परवाना, वाचा...

शेतीशी निगडीत सर्व अवजारे, औषधे, कीटकनाशके व खते शेतकऱ्यांना माफक दरात एकाच छताखाली मिळावीत म्हणून कृषी सेवा केंद्रे सुरू करण्यात आली. कृषी विषयाचे तरुण कृषी सेवा केंद्रांकडे व्यवसायाचे साधन म्हणून पाहत आहेत, त्यातून चांगला नफा मिळतो.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शेतीशी निगडीत सर्व अवजारे, औषधे, कीटकनाशके व खते शेतकऱ्यांना माफक दरात एकाच छताखाली मिळावीत म्हणून कृषी सेवा केंद्रे सुरू करण्यात आली. कृषी विषयाचे तरुण कृषी सेवा केंद्रांकडे व्यवसायाचे साधन म्हणून पाहत आहेत, त्यातून चांगला नफा मिळतो. या केंद्रांमधून खते, बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करता येते. पण, त्यासाठी कृषी विभागाकडून रीतसर परवाना घ्यावा लागतो.

कृषी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यावर तो जिल्हा गुणनियंत्रण अधिकाऱ्यांकडे जातो. त्यांच्या मंजुरीनंतर कृषी उपसंचालकांकडे अर्ज पाठविला जातो. तेथून मंजुरी मिळाल्यावर अंतिम मंजुरीसाठी तो अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे येतो. त्यांनी मंजुरी दिल्यावर कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळतो. साधारण ३० दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होते. पण, केंद्राचा परवाना दर पाच वर्षांनी नूतनीकरण न केल्यास, निर्बंध असलेला माल विकल्यास परवाना रद्द होऊ शकतो.

याशिवाय कृषी सेवा केंद्रातून बेकायदा खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री झाल्यास देखील परवाना रद्द होतो. सोलापूर जिल्ह्यात ९४९० कृषी सेवा केंद्रे असून पंढरपूर, माळशिरस या तालुक्यात सर्वाधिक केंद्रे आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितले.

अर्ज कसा अन्‌ कोठे करायचा?

कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी कृषी पदविका, कृषी विज्ञान विषयातून पदवीप्राप्त कोणीही अर्ज करू शकतो. केंद्राच्या परवान्यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करावा लागतो. सुरुवातीला नोंदणी करून कृषी विभाग निवडून ‘कृषी परवाना सेवा’ या पर्यायावर क्लिक करावे लागते. तेथे बियाणे, रासायनिक खते किंवा कीटकनाशके, यापैकी कोणत्या घटकाची किंवा तिन्हीची विक्री करणार आहात, हे नमूद करावे लागते. कीटकनाशके विक्रीच्या परवान्यासाठी ७५०० रूपये, बियाणे विक्री परवान्यासाठी १००० रुपये आणि रासायनिक खते विक्रीचा परवाना घ्यायला ४५० रुपयांचे शुल्क आकारले जाते.

‘ही’ कागदपत्रे लागतात

ऑनलाइन अर्ज भरताना दुकान ज्या ठिकाणी सुरू करणार आहात, त्या जागेचा गाव नमुना-8, ग्रामपंचायतचे ना-हरकत प्रमाणपत्र, शॉप अॅक्टचा परवाना, कृषी सेवा केंद्र उभारायची जागा स्वतःच्या मालकीची नसल्यास भाडेपट्ट्याचा करार, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो अशी कागदपत्रे लागतात. अर्जदाराचे शिक्षण बी.टेक., बीएसस्सी, कृषी पदविका (दोन वर्षे) व बीएसस्सी ॲग्री आवश्यक आहे. याशिवाय रसायनशास्त्रातून पदवी झालेल्यास कीटकनाशके विक्रीचा परवाना मिळतो.

कृषी सेवा केंद्रातून मिळतो नफा

कोणत्याही व्यवसायामागे नफा हीच अपेक्षा असते. कृषी सेवा केंद्र चालकास कीटकनाशक विक्रीतून ७ ते १३ टक्के, बियाणे विक्रीतून १० ते ११ टक्के आणि खत विक्रीतून तीन ते सात टक्के नफा मिळतो. यामध्ये उधारीवर किती माल विकला जातो, हाही फॅक्टर महत्त्वाचा असल्याचे केंद्र चालक सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

Maharashtra SSC Exam Schedule 2026: तयारीला लागा! SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला कोणता पेपर

धक्कादायक! आईशी भांडून घरातून निघालेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन तास गाडीत किंचाळत होती, पण कोणीच...

Thane Fire News: नववर्षाची सुरुवात आगीच्या घटनांनी; परिसरात धुराचे मोठे लोट; नागरिकांमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT