banana maharashtra
महाराष्ट्र बातम्या

कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौघांची समिती! केळी निर्यातीत जळगाव नव्हे सोलापूर राज्यात पहिल्या क्रमांकावर; ‘या’ ठिकाणी 100 एकरावर होणार केळी संशोधन केंद्र

सर्वाधिक केळी उत्पादनाच्या जळगावला मागे टाकून सोलापूर जिल्हा केळी निर्यातीत अव्वल बनला आहे. आता करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी याठिकाणी केळी संशोधन केंद्र सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सर्वाधिक केळी उत्पादनाच्या जळगावला मागे टाकून सोलापूर जिल्हा केळी निर्यातीत अव्वल बनला आहे. या पार्श्वभूमीवर आता करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी याठिकाणी केळी संशोधन केंद्र सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या कृषी विभागाने त्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राहुरी कृषी विद्यापीठाचे फलोत्पादन विभागप्रमुख, शेलगाव वांगीचे प्रक्षेत्र प्रमुख व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात लागवडीयोग्य क्षेत्र ११ लाख ७३ हजार हेक्टर असून त्यात फळपिकांखालील क्षेत्र आता दीड लाख हेक्टरवर पोचले आहे. जिल्ह्यात आठ लाख शेतकरी असून उजनी धरणाच्या पाण्यामुळे रब्बीच्या जिल्ह्यात आता खरिपाखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे, पण केळी निर्यातीत अव्वल बनलेल्या सोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र नाही.

जिल्ह्यातील येवती, खंडाळी, आष्टी, शेटफळ (ता. मोहोळ), टेंभुर्णी (ता. माढा), कंदर, जेऊर, वाशिंबे, वरकटणे (ता. करमाळा), करकंब (ता. पंढरपूर), अकलूज (ता. माळशिरस) या भागात मोठ्या प्रमाणावर केळीचे क्षेत्र आहे. त्याठिकाणचे शेतकरी दरवर्षी केळीची निर्यात करतात. परदेशातून सोलापूर जिल्ह्याच्या केळीला मोठी मागणी देखील आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात करमाळ्यातील शेलगाव वांगी येथे केळी संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

एका वर्षात साडेपाच लाख मे.टन केळीची निर्यात

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०२३ मध्ये तब्बल साडेपाच लाख मे.टन केळीची निर्यात केली असून त्यातून शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे. जी-९ यासाह अन्य वाणाची जिल्ह्यात लागवड केली जाते. राहुरी विद्यापीठाची शेलगाव वांगी (ता. करमाळा) येथे १०० एकर जमीन आहे. त्याठिकाणी केळी संशोधन केंद्र प्रस्तावित आहे. ओमान, जर्मनी, चीन अशा देशांमध्ये केळी निर्यात होत असून तेथून सोलापूरच्या केळीला मागणी वाढत आहे.

सोलापूर जिल्ह्याची स्थिती

  • लागवडीयोग्य एकूण क्षेत्र

  • ११.७३ लाख हेक्टर

  • खरीपाचे क्षेत्र

  • २.८९ लाख हेक्टर

  • रब्बीचे क्षेत्र

  • ४.६१ लाख हेक्टर

  • ऊसाचे क्षेत्र

  • १.४२ लाख हेक्टर

  • फळपिकांखालील क्षेत्र

  • १.४० लाख हेक्टर

केळी संशोधन केंद्राची सोलापुरात गरज

करमाळ्यातील शेलगाव वांगी येथे डाळींब संशोधन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने स्वतंत्र समिती नेमली असून समितीचा अहवाल लवकरच शासनाला सादर होईल. सोलापूर जिल्ह्यात केळीचे क्षेत्र व निर्यात वाढत असून केळी ओमान, जर्मनी, चीन अशा देशांमध्ये निर्यात होते. केळीचे क्षेत्र वाढावे, ते टिकावे आणि शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी जिल्ह्यात संशोधन केंद्राची गरज असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे.

- दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

अरे हा काय टाइमपास लावलाय... तेजश्री- सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज; म्हणतात- एकही भाग पॉझिटिव्ह...

Kolhapur Flyover Project : कोल्हापुरात दोन उड्डाणपूल होणार, सायबर चौक, संभाजीनगर चौकात उभारणी शक्य, अमल महाडिक यांची माहिती

SCROLL FOR NEXT