Pune Crime esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Crime: 'तिला' व्हायचं होतं पॉर्नस्टार... त्यानं केला घात; पोलिसांच्या पुढाकाराने प्रकरणाचा छडा

सकाळ डिजिटल टीम

पुणेः मागील काही दिवसांपासून पुण्यात अश्लील व्हीडिओंच्या संदर्भात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. आज आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मैत्रिणीला पॉर्नस्टार होण्याचं स्वप्न दाखवून मित्रानेच तिचा घात केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढाकार घेऊन पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

pune port pornstar

त्याचं झालं असं, एक अल्पवयीन मुलगी आणि अल्पवयीन मुलगा यांची सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर ते एकमेकांना भेटत राहिले. पुढे त्यांची मैत्री वाढत गेली. या प्रकरणातील आरोपी मुलाने ''तुला आंतरराष्ट्रीय पॉर्नस्टार बनवतो'' असं म्हणत तिला जाळ्यात ओढलं. तिला अश्लील व्हीडिओ बनवण्यास भाग पाडलं. तिनेही मित्राच्या आमिषाला बळी पडत त्याला व्हीडिओ बनवून पाठवले. मात्र ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच घात केला. त्या मित्राने मैत्रिणीचे 'ते' व्हीडिओ एका पॉर्न वेबसाईटवर अपलोड केले. अपलोड केलेले ते व्हीडिओ पीडितेच्या मैत्रिणीने बघितले आणि प्रकरण उघडे पडले.

पीडितेने सगळा प्रकार कुटुंबियांना सांगिताला. परंतु आरोपीविरोधात कुणीही तक्रार देण्यास पुढं आलं नव्हतं. शेवटी पोलिसांनी पुढाकार घेऊन स्वतः याप्रकरणाची तक्रार दिली. वारजे पोलिस ठाण्यात या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates : देवळाली कॅम्पमध्ये हायवा ट्रक बंगल्यात घुसला

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

Health Tips: डाएट्‌सच्या फॅड मध्ये अडकलाय? "झिरो फिगरच्या प्रेमात पडण्यापूर्वी आधी फायदे तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT