ज्येष्ठ नागरिक

 
Canva
महाराष्ट्र बातम्या

शिक्षिका राहिलेली आई १० वर्षे मोलकरीण! मुलगा एमआर, दुसरा पुण्यात नोकरीला, सून वकील, तरी मुलांनी जन्मदात्यांनाच काढले घराबाहेर; मुले-सूनांविरुद्ध गुन्हा, वाचा...

वृद्ध आई-वडिलांच्या राहण्याची, जेवणाची आणि आरोग्याची कोणतीही व्यवस्था न करता दोन्ही मुलांनी त्यांना घराबाहेर हाकलले. तब्बल १० वर्षे दोन्ही मुलांनी आणि सुनांनी त्यांचा सांभाळ केला नाही. त्यानंतर फिर्यादी नंदा रमेश शिंदे (वय ६८, रा. जुनी मिल चाळ, मुरारजी पेठ) या पुण्यात १० वर्षे दुसऱ्यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करीत होत्या. मुलांकडून सांभाळ होत नसल्याने त्यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

तात्या लांडगे

सोलापूर : वृद्ध आई-वडिलांच्या राहण्याची, जेवणाची आणि आरोग्याची कोणतीही व्यवस्था न करता दोन्ही मुलांनी त्यांना घराबाहेर हाकलले. तब्बल १० वर्षे दोन्ही मुलांनी आणि सुनांनी त्यांचा सांभाळ केला नाही. त्यानंतर फिर्यादी नंदा रमेश शिंदे (वय ६८, रा. जुनी मिल चाळ, मुरारजी पेठ) या पुण्यात १० वर्षे दुसऱ्यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करीत होत्या. मुलांकडून सांभाळ होत नसल्याने त्यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांना एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची मोठी मदत मिळाली. नंदा शिंदे (वय ६८) यांच्या फिर्यादीवरून दोन्ही मुलांसह सुनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नंदा शिंदे या सोलापूर शहरातील एका खासगी शाळेत कंत्राटी शिक्षिका होत्या. मुलांचे उच्चशिक्षण झाले. एक मुलगा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (एमआर) झाला, तर दुसरा पुण्यात चांगल्या नोकरीला लागला. दोघांचेही विवाह झाले. एक सून वकील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही मुलांनी आणि त्यांच्या पत्नींनी २०१५ पासून नंदा शिंदे व त्यांचे पती रमेश शिंदे यांचा छळ सुरू केला. त्यांनी वयोवृद्ध आई-वडिलांच्या राहण्याची, जेवणाची आणि आरोग्याची कोणतीही काळजी घेतली नाही. त्यांना वारंवार शिवीगाळ करून घराबाहेर काढले आणि त्यांच्या नावावरील घराचा स्वतः उपभोग घेतला. तसेच, १० जुलै रोजी फिर्यादी नंदा शिंदे स्वतःच्या घरी गेल्या असता, त्यांना पुन्हा घराबाहेर हाकलून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी त्यांची मुले अतुल व अनुप तसेच त्यांच्या पत्नी सुवर्णा व दीपाली यांच्याविरुद्ध ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण व कल्याण अधिनियम, २००७ मधील कलम २४ अन्वये गुन्हा दाखल केला.

आईच्या घरावर कब्जा; मुलांना चौकशीसाठी बोलावले

फिर्यादी नंदा शिंदे यांना त्यांच्या आई-वडिलांकडून हे घर मिळाले होते. मात्र, त्याच हक्काच्या घरातून मुलांनी त्यांना बाहेर काढले. त्यानंतर पुण्यातील मुलाकडे गेल्यावर त्यानेही त्यांना आधार दिला नाही. २०१५ पासून नंदा शिंदे या दुसऱ्यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करीत होत्या, तर त्यांचे पती नातेवाईकांकडे राहत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलांना चौकशीसाठी बोलावले; मात्र, मंगळवारी (ता. १४) ते हजर झाले नव्हते. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार कसबे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन प्रियंका गांधींचा संताप; म्हणाल्या....

Stock Market Crash: 4 दिवसांत गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी स्वाहा! शेअर बाजार का कोसळला?

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

Tariff Relief औषधांवरील अतिरिक्त शुल्क रद्द अमेरिकेचा निर्णय; भारतासह २० देशांना दिलासा

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

SCROLL FOR NEXT