Abdul sattar on Maharashtra Cabinet Expansion cm eknath shinde political news  
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion: पत्ता कट झाल्याची कुणकुण लागताच सत्तार दिल्लीत दाखल?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. या बंडातील सर्व आमदारांनी हिंदुत्वाचं कारण देत शिंदे गटात सामील झाल्याचं म्हटलं होतं. या बंडखोरांमध्ये तत्कालीन ठाकरे सरकरमधील मंत्री अब्दुल सत्तार देखील सामील होते. त्यावेळी सत्तार देखील हिंदुत्वासाठीच बंडखोरांसोबत गेले का, असे खोचक प्रश्न विचारण्यात येत होते. यावरून त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं होतं. मात्र आता सत्तार यांचे नाव नव्या मंत्रींडळाच्या यादीतून वगळल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही. सहाजिकच या मंत्रीमंडळात संख्याबळानुसार भाजपचं वर्चस्व राहणार असल्याचं स्पष्ट आहे. तर सत्तार हे शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे सत्तार यांना मंत्रीपद मिळणार की नाही, यावर तर्कवितर्क लावले जात आहे. मात्र मंत्रीमंडळाच्या यादीतून नाव वगळल्याची कुणकुण सत्तार यांना लागल्यामुळेच ते दिल्लीत दाखल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील अनेक नेते मंत्रीपदासाठी लॉबिंग करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले असून सत्तार देखील त्यासाठीच गेल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तार हे मंत्री होते मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री होणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे जे निर्णय घेतात, त्यांना त्यात अनेक अडचणी येतात. त्या अडचणींमधून आम्हाला मंत्री करण्यात त्यांना काही अडचणी येत असेल, तर ते त्या अडचणीप्रमाणे निर्णय घेतील. आम्ही शिंदे यांच्यासोबत कोणत्याही अटी ठेवून आलो नाही.

राज्यातील राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला आहे? या प्रश्नाचे उत्तर देतान अब्दुल सत्तार म्हणाले की, महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात कदाचीत वाटाघाटी झाली असेल, असे मला वाटतं. पण अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. मला वाटतं की दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल आणि तीन तारखेच्या आत शपथविधी होईल. मला वाटतं की तीन तारखेच्या आत शंभर नव्हे एकशे एक टक्के शपथविधी होईल, असे सत्तार यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Kumbh Mela 2027 : कुंभमेळा, पुलाच्या कामांसाठी 517 झाडे तोडण्यास मंजुरी; नाशिक महापालिकेच्या वृक्ष समितीचा मोठा निर्णय, 2 कोटींचा मेगा प्लॅन काय?

Pregnant Woman Rescue : टाकळीतील गर्भवतीचा जीवघेणा प्रवास! सुरुवातीला बांबूची झोळी, नंतर मालवाहतूक गाडी; शेवटी रुग्णवाहिकेतून दवाखान्यात

Virar News : क्षणात संदेश पोहचणाऱ्या डिजिटल युगात, 'देवाभाऊ तुम्हीच आम्हाला शिक्षण देऊ शकता'; पोस्टकार्ड पेटीत पत्र टाकून मुलांनी घातली भावनिक साद

Pune: फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न अधिवेशनात; प्रशासनाला तातडीने कारवाईचे आदेश देण्याची आमदार शिरोळे यांची मागणी

Latest Marathi News Live Update : पालिकेतील सत्ता बदलानंतर २ जणांचा मृत्यू, मॅनहोल दुर्घटनेवर मनसेच्या संदीप देशपांडेची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT