abdul sattar on maharashtra cabinet expansion will happen before august 3 political news  
महाराष्ट्र बातम्या

शंभर नव्हे एकशे एक टक्के...; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सत्तारांनी स्पष्टच सांगितलं

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर ३० जूनला मुख्यंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली मात्र त्यानंतर अद्यापही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या पार्श्वभूमिवर शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी आज एका वृत्तवाहिनीला बोलातना येत्या ३ तारखेपर्यंत राज्यात मंत्रिमडळाचा विस्तार होईल असे म्हटले आहे.

दरम्यान राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना सत्तार म्हणाले की, महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात कदाचीत वाटाघाटी झाली असेल असे मला वाटतं. पण अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. मला वाटतं की दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल आणि तीन तारखेच्या आत शपथविधी होईल. मला वाटतं की तीन तारखेच्या आत शंभर नव्हे एकशे एक टक्के शपथविधी होईल असे सत्तार यावेळी म्हणाले.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे का? यावर बोलताना सत्तार म्हणाले की, सुप्रिम कोर्टाचा आणि याचा काही संबंध नाही, सुप्रीम कोर्ट जे निर्णय देईल तो सर्वांना मान्य असेल, पण एक तारखेला सुनावणी होणार आहे, वकिल म्हणणं मांडतील त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल, जो सर्वांना मान्य असेल असेही सत्तार यांनी म्हटले.

मंत्रिपद मिळेल असं वाटतंय का? या प्रश्नाला उत्तर देतान सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जे निर्णय घेतात त्यामध्ये काही अडचणी येतात, त्या पाहून राज्यामध्ये मला मंत्री करण्यात काही अडचणी येत असतील तर ते निर्णय घेतील. मी कोणतीही अट न ठेवता शिंदे गटात सामील झालो आहे. मंत्रिपदाबद्दल बोलायचे झाले तर, मी तीन वेळा मंत्री होतो, असे सत्तार यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT