Aaditya Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Aaditya Thackeray: वाद चिघळणार? आदित्य ठाकरेंनी जारी केला मुंबईतील महामोर्चाचा टीझर

Sandip Kapde

Aaditya Thackeray: शिवसेना ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवर येत्या १ जुलैला विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली होती.

महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी रोखण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचे नेते या मोर्चात आले तर त्यांचे स्वागतच करू, असेही त्यांनी म्हटले होते. दरम्यान या मोर्चाचा टीझर जारी करण्यात आला आहे.  

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गट महानगर पालिकेवर मोर्चा काढणार आहेत. मुंबईकरांच्या पैश्यांची लूट, होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसताना काढण्यात आलेले रस्ता काँक्रिटीकरणासाठी काढलेले मेगा टेंडर म्हणजे अक्षरशः मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी केली गेली आहे असा थेट आरोप ठाकरे गटाकडून सरकार आणि महानगर पालिकेवर करण्यात आला आहे.

दादर येथील शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली होती. ते म्हणाले होते, राज्यातील महापालिकांच्या निवडणुका पावसाप्रमाणे लांबत चालल्या आहेत. जाब विचारणारे कुणी नाही. अशा प्रकारे शिंदे सरकारचा उधळपट्टी कारभार सुरू आहे. वारेमाप पैसा उधळला जातो आहे.

जी-२०च्या नावाने लुटालूट सुरू आहे. आतापर्यंत जवळपास सात ते नऊ हजार कोटी वापरण्यात आले आहेत. या जनतेच्या पैशाचा हिशेब जनतेला द्यावाच लागेल. त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

मुंबईला कोणी मायबाप राहिला नाही. एक काळ असा होता, की मुंबई महापालिका तुटीमध्ये होती. त्याच्यानंतर शिवसेनेकडे सत्ता आली. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास ९० हजार कोटींच्या ठेवीपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत आमच्या कारभाराने म्हणा किंवा आमच्या सहकार्याने म्हणा भर पडली. महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT