aditya thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

मुलांना उपस्थितीचे बंधन नाही : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

राज्याच्या काही भागांतील शाळा सुरू होत असताना मंत्री ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे गोंधळ वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य सरकारने शाळा उघडण्याचा निर्णय घेतला खरा; मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे बंधन पालकांवर नसल्याचे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांना जोखमीचे वाटत असेल तर त्यांनी मुलांना पाठवू नये, असाही सल्लाही ठाकरे यांनी दिला. उद्यापासून (ता.२४) राज्याच्या काही भागांतील शाळा सुरू होत असताना मंत्री ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे गोंधळ वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची स्थिती पाहून सोमवारपासून (ता. २४) इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग भरणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘ कोरोना काळात गेल्या सातशे दिवसांपासून शाळा बंद असल्याने आता त्या सुरू केल्या जाणार आहेत. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्याबाबत बंधन घातलेले नाही. वर्ग भरल्यानंतर कोरोना पसरणार नाही, याची काळजी शाळा आणि पालकांनी घ्यायची आहे.

कोरोनाचा संसर्ग जिथे वाढणार नाही, अशा भागांतील शाळा सुरू होतील. काही जिल्ह्यांत लगेचच शाळा उघडणार नाहीत.’’ दरम्यान काही पालक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी सरसकट शाळा उघडण्यास याआधीच विरोध दर्शविला होता. यामुळे राज्य सरकारने देखील सावध भूमिका घेतल्याचे बोलले जाते.

राज्यातील कोरोना स्थिती पाहूनच महाविद्यालये उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. संबंधितांना त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे.

- उदय सामंत, उच्चतंत्र शिक्षणमंत्री

सोमवारपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरू होत आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडीही लक्षणे आढळून आल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.

- राजेश टोपे, आरोग्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT