Nana Patole
Nana Patole Esakal
महाराष्ट्र

Nana Patole : पटोलेंची डोकेदुखी वाढली, थोरातांच्या समर्थनार्थ काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

सकाळ डिजिटल टीम

नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबे विरुद्ध पटोले असा सुरू झालेला वाद आता काँग्रेसमधील राजीनाम्यापर्यंत पोहचली आहे. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये पटोले आणि थोरात असे दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचेच काम केल्यानं काँग्रेसमध्ये तांबे यांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर नाराजी पसरली होती. त्यानंतर गटनेते पदाचा राजीनामा देखील बाळासाहेब थोरात यांनी दिल्यानंतर काँग्रेसच्या वर्तुळात नाराजीचा सुर दिसून येऊ लागला आहे. त्यातच आता बाळासाहेब थोरात यांच्या गटनेते पदाच्या राजीनाम्यानंतर आता नाशिकमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे.

बाळासाहेब थोरातांच्या समर्थनार्थ नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील तालुकाध्यक्षांसह 12 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ हा राजीनामा दिला असून तांबे पितापुत्रावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. तांबे-थोरात विरुद्ध नाना पटोले हा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामध्ये थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाशिकमध्ये राजीनाम्याचे सत्र सुरू आहे.

नाशिकमधील राजीनाम्याचे सत्र पाहता तांबे आणि थोरात यांचा अधिक संबंध नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी राहिला आहे. त्यामुळे येत्या काळात राजीनामा सत्र सुरू झाल्यास नाना पटोले यांच्यासाठी ही बाब डोकेदुखी ठरू शकते. थोरात आणि तांबे यांना काँग्रेस प्रदेश कार्यालयाने अपमानास्पद वागणूक दिल्याने निषेधही व्यक्त केला आहे. पेठ तालुका काँग्रेस, आदिवासी सेल काँग्रेस, सहकार सेल काँग्रेस, युवक काँग्रेस, , शहर काँग्रेस आणि एन. एस. यू. आयचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राजीनामा देत थोरात तांबे यांना समर्थन देण्यास सुरुवात केली आहे.

बाळासाहेब थोरात यांना भाजपकडून खुली ऑफर

शिंदे गटानंतर आता भाजप प्रवक्ते राम शिंदे यांनी देखील पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. राम शिंदे शुक्रवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आहे. तसेच भाजप हा देशात सर्वात मोठा पक्ष आहे.यामुळे कोणत्याही पक्षातील कोणी नेते दु:खी,किंवा अडचणीत असतील त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांना भाजप आसरा देण्यासाठी तयार आहे. असं म्हणत राम शिंदे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना खुली ऑफर दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT