Ajit Pawar

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

बारामतीनंतर अजितदादांचे दुसरे प्रेम सोलापूर! ३१ जानेवारीला होती मोहोळ-पंढरपूरला सभा; सोलापूरला दिले ‘हे’ दमदार पालकमंत्री; त्यांचे ‘हे’ स्वप्न राहिले अधुरे

सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढण्यात अजित पवार यांचे योगदान मोठे आहे. याशिवाय, उजनीतील पाण्याचे नियोजन, सोलापूर शहराचा पाणीपुरवठा, सोलापुरातील उद्योगवाढीसाठीही त्यांनी नेहमीच मंत्रालयातून मदत केली. कोरोनाचे संकट असो की अतिवृष्टी, महापूर अशा कठीण परिस्थितीत त्यांचे सोलापूरकडे विशेष लक्ष होते. कोरोनात तर त्यांनी सोलापूरकरांच्या मागणीवरून पालकमंत्री देखील बदलले होते. बारामतीनंतर अजितदादांचे दुसरे प्रेम जणू सोलापूर होते, इतका स्नेह त्यांचा जिल्ह्यासोबत होता.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे राजकारण, सहकार आणि अर्थकारणावर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांची छाप आहे. बारामतीनंतर सोलापूर जिल्हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिला. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात नामदेवराव जगताप, शंकरराव मोहिते पाटील, संभाजीराव गरड, औदुंबर पाटील हे तगडे नेते त्यांच्यासोबत होते. हेच संबंध राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढे कायम जपले. त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सोलापूरकडे विशेष लक्ष दिले. सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढण्यात अजित पवार यांचे योगदान मोठे आहे.

याशिवाय, उजनीतील पाण्याचे नियोजन, सोलापूर शहराचा पाणीपुरवठा, सोलापुरातील उद्योगवाढीसाठीही त्यांनी नेहमीच मंत्रालयातून मदत केली. कोरोनाचे संकट असो की अतिवृष्टी, महापूर अशा कठीण परिस्थितीत त्यांचे सोलापूरकडे विशेष लक्ष होते. कोरोनात तर त्यांनी सोलापूरकरांच्या मागणीवरून पालकमंत्री देखील बदलले होते. बारामतीनंतर अजितदादांचे दुसरे प्रेम जणू सोलापूर होते, इतका स्नेह त्यांचा जिल्ह्यासोबत होता.

लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळी त्यांचे दौरे, सभा व्हायच्या. ते आवर्जुन सोलापूर जिल्ह्यात येत होते. राज्यात ज्या ज्या वेळी सत्ता आली, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूर जिल्हा स्वत:कडेच ठेवला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार १९९० च्या दशकात जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, दिलीप सोपल, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रिफ, जितेंद्र आव्हाड आणि अलिकडे दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. त्यात अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची होती. सोलापूरची जिल्हा मध्यवर्ती बॅंक पुन्हा उभारी घ्यावी, यासाठी देखील ते विशेष लक्ष ठेवून होते.

उद्योजकांची खंत : अजितदादा असते तर...

सोलापूरमधील उद्योजकांची सोमवारी झालेल्या बैठकीत एका ज्येष्ठ उद्योजकाने भावना व्यक्त केली, की मागणी करूनही उद्योगांसाठी जागा मिळत नाही, निर्णय लवकर होत नाहीत. अशा वेळी अजित पवार असते, तर जागेवरच फाईल मागवून अधिकाऱ्यांना जाब विचारून निर्णय झाला असता. यापूर्वी त्यांनी अनेकदा उद्योजकांना अशाच पद्धतीने मदत केली होती, अशी आठवण उद्योजकांनी सांगितली.

३१ जानेवारीला पंढरपूर–मोहोळ सभा नियोजित

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ३१ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीला सोलापूर दौऱ्यावर येणार होते. पंढरपूर आणि मोहोळ येथे त्यांच्या सभा नियोजित होत्या. नगरपालिका निवडणुकीदरम्यान कुर्डुवाडीत झालेली सभा ही सोलापुरातील त्यांची शेवटची सभा ठरली.

...अन्‌ सोलापूरला येणे राहूनच गेले

राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांचे चिरंजीव विजयराज डोंगरे यांच्या पक्षप्रवेशासाठी १४ जानेवारीला अजित पवार शेटफळ (ता. मोहोळ) येथे येणार होते. मात्र त्याच दिवशी आचारसंहिता लागू झाल्याने कार्यक्रम रद्द झाला. नंतर १६ जानेवारीला बारामतीत हा प्रवेश झाला. ३१ जानेवारीच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विजयराज डोंगरे यांनी मंगळवारी रात्री अजित पवार यांना निवासस्थानी चहासाठी येण्याचे आमंत्रण दिले होते. ‘विजयराजकडे जरा लक्ष द्या,’ असा सल्ला अजित पवार यांनी मनोहर डोंगरे यांना दिला होता, ही आठवण सांगताना विजयराज गहिवरले.

बोरामणी विमानतळाचे भूसंपादन मार्गी

बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ५४९.३४ हेक्टर जमिनीचे संपादन झाले होते; मात्र २९ हेक्टर जमीन प्रलंबित होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असताना अजित पवार यांनी मार्च २०२१ मध्ये ४० कोटींचा निधी मंजूर करून उर्वरित भूसंपादन मार्गी लावले. विमानतळामुळे उद्योग वाढतील आणि रोजगार निर्माण होईल, या हेतूने त्यांनी स्थानिक आमदारांची मागणी तत्काळ मान्य केली होती.

जिल्ह्यातील साखर कारखानदारीला बळ

राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून साखर कारखान्यांना शासकीय थकहमी व मार्जिन मनीसाठी मदत देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक सहकारी कारखान्यांना याचा लाभ झाला. टोळी कामगार, ‘व्हीएसआय’, सूतगिरण्या, जिल्हा दूध संघ आणि जिल्हा बँकांनाही त्यांनी मदत केली. मदतीआधी शिस्तीचे धडे देत ते थेट जाब विचारत असत. अडचणीत असलेल्या खासगी साखर कारखान्यांनाही त्यांनी वेळोवेळी हात दिला, अशी आठवण युटोपियन शुगरचे प्रमुख उमेश परिचारक यांनी सांगितली.

पापरी गावकऱ्यांचे स्वप्न अधुरेच

मोहोळ तालुक्यातील पापरी येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेला दिलेल्या भेटीत अजित पवार यांनी अडीच एकर जमीन देण्याचे आश्वासन पाळले. आज त्या जागेवर देखणी शाळा उभी राहत आहे. उद्घाटन त्यांच्या हस्ते व्हावे, असा गावकऱ्यांचा मानस होता. मात्र आता हे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

तरुण पिढीच्या राजकारणाला बळ

सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या समविचारी आघाडीच्या माध्यमातून तरुण पिढी राजकारणात पुढे यावी, यासाठी अजित पवार यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठबळ दिले. जयकुमार गारे, संजयमामा शिंदे, प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, उत्तम जानकर, रणजितसिंह निंबाळकर, विजयराज डोंगरे, सुरेश हसापुरे यांसारख्या नेत्यांना याचा लाभ झाला.

कार्तिकी महापूजेची दोन वेळा संधी

पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान अजित पवार यांना दोन वेळा मिळाला. २६ नोव्हेंबर २०२० आणि १५ नोव्हेंबर २०२१ रोजी. आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री म्हणून करण्याची इच्छा मात्र अपुरीच राहिली, अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED seizes Anil Ambani assets : अनिल अंबानींविरुद्ध ‘ED’ची मोठी कारवाई! १ हजार ८८५ कोटींच्या मालमत्ता तात्पुरती जप्त

दिलीप सोपलांनी जागवल्या आठवणी! अजितदादांनीच केले मला मंत्री; चेष्टा करणारा मी एकमेव आमदार, एकदा मी झोपेत असताना सकाळी ६ वाजताच दादांचा कॉल आला अन्‌...

Ajit Pawar Death News LIVE Updates : पायलट सुमित कपूर दिल्लीचा रहिवासी होते

Pune University Exam : मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या गुरुवारी होणारी हिवाळी सत्र परीक्षा पुढे ढकलली

Phulambri News : 'अरे राजू, नुसतेच नारळ फोडतोय का?' – दादांचा तो सवाल, पाथ्रीच्या विकासाची दिशा ठरवणारा क्षण - राजेंद्र पाथ्रीकर

SCROLL FOR NEXT