महाराष्ट्र

सहमतीच्या घटस्फोटानंतरही पोटगीचा हक्क अबाधित 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - सहमतीच्या घटस्फोटात पोटगी घेणार नाही, असे मान्य करूनही पत्नीने भविष्यात गरज भासल्यास पोटगी मागितली, तर पतीने पोटगी द्यायला हवी, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला.

पत्नीला पोटगी देण्याचा कनिष्ठ न्यायालयाने निर्णय दिला होता. त्याला पतीने आव्हान दिल्यावर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार देऊन अगोदरचा निकाल कायम ठेवला. 

सांगलीतील पती-पत्नीच्या कौटुंबिक वादाबाबत उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. संबंधित दांपत्याने आठ वर्षांपूर्वी लोकअदालतीत सहमतीने घटस्फोट घेतला होता. त्याबाबतच्या अटी लेखी स्वरूपात दोघांनीही स्थानिक न्यायालयात मान्य केल्या होत्या. त्यानुसार सहमतीने घटस्फोट घेत असून, पत्नी पतीकडून पोटगीची मागणी करणार नाही, असे नमूद करण्यात आले होते; मात्र घटस्फोटानंतर पत्नीने काही महिन्यांतच पोटगीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. हा अर्ज स्थानिक न्यायालयाने मंजूर करून पतीने पत्नीला पोटगी द्यावी, असे आदेश दिले होते. या निर्णयाला पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. पत्नीने सहमतीने घटस्फोट घेताना पोटगी मागणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता तिला पोटगी मागण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद पतीच्या वतीने करण्यात आला होता. त्यावर न्या. एम. एस. सोनक यांनी, पोटगी घेणार नाही, असे पत्नीने मान्य केले असले, तरी भविष्यात तिला गरज वाटल्यास ती पोटगीसाठी आग्रह धरू शकते, असे स्पष्ट करत आधीचा निकाल काण ठेवला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT