CM Uddhav Thackeray eSakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: ठाकरे गटात पक्षप्रवेश झाल्यानंतर काही दिवसात उपनेत्यासह 32 जणांवर गुन्हा दाखल

ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल झाल्याने उलट सुलट चर्चांना उधाण

सकाळ डिजिटल टीम

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना मोठा धक्का बसला आहे. मालेगावमधील वेगवेगळ्या दोन पोलिस ठाण्यामध्ये यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासह एकूण 32 जणांवर हा गुन्हा करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये हिरे कुटुंबातील काही व्यक्तींचा समावेश असल्याने या गुन्ह्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात उभं केल्यानंतर ही कारवाई झाल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. हिरे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाल्याने मालेगावसह नाशिक जिल्ह्यात गुन्हा कोणत्या कारणावरून दाखल झाला असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहेत.

महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समितीमध्ये नोकरी लावून देण्याच्या प्रकरणावरुन गेल्या आठवड्यात फसवणूक झालेल्या तरुणांनी आंदोलन केले होते. त्यावरून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर लगेच रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यामध्ये सुमारे 32 कोटींची जिल्हा बँकेची दिशाभूल केल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती त्यावरून दूसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकूणच दोन्ही गुन्हे पाहता हिरे कुटूंबियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मालेगाव शहरातील दोन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्यानंतर अद्वय हिरे यांची राजकीय ताकद वाढली होती. त्यामुळे त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू रंगल्या आहेत.

अशातच भाजपला जय महाराष्ट्र करत ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर अद्वय हिरे यांना उपनेते पदही देण्यात आले होते. त्यानंतर शिवसेनेचे दादा भुसे यांच्या विरोधात आगामी काळात निवडणूक लढवण्याची तयारी केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश आणि मालेगाव पोलीस ठाण्यात दोन ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे यामुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. जिल्हा बँकेने इतक्या दिवस का कारवाई केली नाही? असाही सवालही उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT