Ahmednagar recorded the lowest temperature in the state
Ahmednagar recorded the lowest temperature in the state 
महाराष्ट्र

नगरला हुडहुडी; पुण्यात उष्मा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - किमान तापमानात घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढू लागला आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान नगर येथे १२.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पारा १५ अंशांच्याखाली गेला; तर पुण्यात मात्र अंशतः ढगाळ हवामानामुळे मागील तीन दिवसांच्या तुलनेत बुधवारी दुपारच्या तापमानात वाढ झाली होती.

मंगळवारच्या तुलनेत किमान तापमान ०.३ अंश सेल्सिअसने वाढून ते १५.६ अंश सेल्सिअस इतके झाले. कमाल तापमान एक अंश सेल्सिअसने वाढून ते ३०.८ अंश सेल्सिअसवर गेले होते.

लोहगाव येथे किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. शहर आणि शहर परिसराप्रमाणेच मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान सरासरीपेक्षा किंचित वाढल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे; तसेच पुढील २४ तास आकाश अंशतः ढगाळ असेल. त्यामुळे किमान तापमानात किंचित वाढ होईल. उद्या (ता. २१) किमान तापमान १७ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT