solapur civil hospital

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

‘सिव्हिल’मध्ये औषध न्यायला आलेल्या आजीबाईला 3 महिलांनी लुटले! रेशनमधून साडी अन्‌ 5000 रुपये मिळणार असल्याचे सांगून काढून घेतले दागिने, रुग्णालयाच्या गेटवर ‘CCTV’च नाहीत

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) दररोज हजारो रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची ये-जा सुरू असते. अनेकदा रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरीला गेल्या आहेत. आता मुंबईतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधे न्यायला आलेल्या ८० वर्षीय आजीबाईला तीन अनोळखी महिलांनी लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) दररोज हजारो रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची ये-जा सुरू असते. अनेकदा रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरीला गेल्या आहेत. आता मुंबईतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधे न्यायला आलेल्या ८० वर्षीय आजीबाईला तीन अनोळखी महिलांनी लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. पण, रुग्णालयाच्या दोन्ही गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांना त्या महिलांना शोधताना अडचणी येत आहेत.

मुलीकडे मुंबईला राहणाऱ्या धानव्वा राजाराम नेगलगाय (वय ८०, रा. रामवाडी, पारसी बंगला, सोलापूर) या ११ तारखेला सकाळी साडेअकरा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात गेल्या होत्या. त्यांना दम्याचा त्रास असल्याने त्या मुंबईतून औषध न्यायला खास करून सोलापुरात आल्या होत्या. अनेक वर्षांपासून त्या आवर्जून औषध न्यायला सिव्हिलमध्ये येतात. नेहमीप्रमाणे गुरुवारी त्या सिव्हिलमध्ये गेल्या होत्या. वयस्क आजीबाई पाहून रुग्णालयाच्या आवारातील तीन महिलांनी त्यांना गाठले. ‘येथे गरीब लोकांना रेशनचे लुगडे व पाच हजार रुपये रोख देत आहेत, तुमच्या अंगावरील सोने पाहून ते देणार नाहीत, त्यामुळे ते सोने, रोकड पिशवीत ठेवा’ असे सांगून त्यांनी विश्वास संपादित केला.

त्यानुसार त्या आजीबाईने अंगावरील दागिने व रोकड पिशवीत ठेवली. एका पिशवीतून दुसऱ्या पिशवीत त्यांनी दागिने व पैसे ठेवले आणि नजर चुकवून आजीबाईच्या हाती दुसरीच पिशवी टेकवून त्या तिघीही तेथून पसार झाल्या. घाबरलेल्या आजीबाईंनी मुलीशी चर्चा करून १६ सप्टेंबरला सदर बझार पोलिस ठाणे गाठले. त्या तिन्ही अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे तपास करीत आहेत.

पोलिस निरीक्षक स्वत: भेटले, तरीही...

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दररोज मोठी वर्दळ असते. अनेकदा त्याठिकाणी दुचाकी चोरीसह अन्य घटना घडतात. त्या गुन्ह्यांच्या तपासासाठी गेल्यावर तेथे सीसीटीव्ही कॅमेरे अपुरे आहेत, काही कॅमेरे बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिस निरीक्षकांनी स्वत: तेथे जाऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला सांगितले. तरीपण, रुग्णालयाच्या आवारातील स्थिती ‘जैसे थे’ आहे हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CET Exams : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र सीईटी परीक्षा आता वर्षातून दोनदा; उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची घोषणा

Girija Oak National Crush : न्यू नॅशनल क्रश गिरिजा ओक! निळ्या रंगाच्या साडीत असं काय आहे की, चाहत्यांना वेड लावलं?

Viral Video: सहा बायका... एकाच वेळी सर्व गर्भवती; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi Breaking News : नागपूर नगरपालिका नगरपंचायत बैठक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक

RCBला व्हावं लागणार पुणेकर? बंगळुरुतल्या चेंगराचेंगरीमुळे IPL 2026मध्ये मोठा निर्णय घेण्याची शक्यता....

SCROLL FOR NEXT