ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: वज्रमुठ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत; स्वतःच केला खुलासा

महाविकास आघाडीची नागपूरात दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे.

धनश्री ओतारी

महाविकास आघाडीची नागपूरात दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. दरम्यान, अजित पवार या सभेत बोलणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. अशातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित झालेल्या प्रश्नावर मौन सोडले आहे. त्यांनी भाषण करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. (Ajit Pawar big statement not speech in Mahavikas Aghadi Vajramuth Sabha nagpur )

अजित पवार नागपुरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी संध्याकाळी होणाऱ्या सभेवर भाष्य केलं. तसेच ते सभेदरम्यान भाषण करणार नसल्याचे स्पष्ट करत यामागचे कारणदेखील त्यांनी यावेळी सांगितलं.

म्हणून अजित पवार भाषण करणार नाहीत

नागपूर सभेनंतर नाशिक आणि कोल्हापूर येथे वज्रमुठ सभा पार पडणार आहे. माझ्यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मी भाषण करणार की नाही अने प्रश्न उपस्थित होतायत. तर प्रत्येक पक्षाच्या दोन मान्यवरांनी भाषण करायचं असं ठरलं आहे. कोणी दोघांनी करायचं ते पक्षान ठरवायचं आहे.

मागे झालेल्या सभेत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण, शिवसेनाकडून उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे आणि राष्ट्रवादीकडून मी आणि धनंजय मुंडे यांनी भाषण केलं होतं.

तर आजच्या सभेत आमच्या तर्फे जयंत पाटील आणि अनिल देशमुख भाषण करणार आहेत. देशमुख हे विदर्भातील आहेत. पाटील हे पक्षाचे प्रांतध्यक्ष आहेत. नाना पटोले आणि सुधीर केदार हे बहुतेक भाषण करतील. मर्यादीत वेळेत भाषण जनतेला ऐकायला मिळावं हे या मागचा हेतु आहे. असही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे या सभेत बोलणार का? काय बोलणार? असे अनेक सवाल उपस्थित होतायत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT