Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : मोठी बातमी! अजित पवारांनी साधला ४० आमदारांशी संपर्क, राज्यपालांकडे देणार यादी?

Sandip Kapde

महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, त्यांनी आमदारांची बैठक बोलावल्याचेही वृत्त समोर आले आहे. दरम्यान द न्यू इंडियन एक्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांपैकी ४० आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. याबाबत ते राज्यपालांना यादी देणार असल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीबद्दलच्या अटकळी गेल्या आठवड्यापासून जोरात सुरू आहेत. अजित पवार यांनी नियोजित बैठका रद्द केल्या आणि भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देखील मवाळ भूमिका घेतली. त्यामुळे अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

योग्यवेळी आल्यावर ४० आमदारांची यादी अजित पवार राज्यपालांकडे देणार असल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. अजित पवार यांनी वयैक्तिक रीत्या ४० आमदारांना संपर्क साधला आहे. या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावरील निर्यण काही दिवसांवार येऊन ठेपला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आधी अजित पवार यांनी शपथ घेतल्यास सरकार पडणार नाही, असे देखील वृत्तात म्हटले आहे.

“आतापर्यंत राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या आहेत. वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल,” अशी माहिती पक्षातील एका चांगल्या सूत्राच्या हवाल्याने द न्यू इंडियन एक्प्रेसने दिली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे यावर खडखडीत मौन आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांच्या सह्या घेण्यासाठी वैयक्तिकरित्या बोलावले असताना शरद पवार यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. २०१९ मध्ये अजित पवार बंड केल्यानंतर शरद पवार यांनी आपला पक्ष अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांना बोलावले होते, अशी माहिती देखील द न्यू इंडियन एक्प्रेसने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? राज्यात भोंदूबाबांचा सुळसुळाट, दोन महिन्यात तब्बल ३५ जणांवर कारवाई

POSH Act Maharashtra:‘पॉश कायदा’ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांनाही तपासणी अधिकार..

पंजाबसाठी आज 'करो या मरो'! बंगळूरविरुद्ध पराभव झाल्यास पॅकअप; पाहा काय आहे गणित

War Based Marathi Books : विश्वास पाटील यांची ‘द ग्रेट कांचना सर्कस’ कादंबरी; युद्ध, सर्कस आणि माणूस–प्राण्यांच्या संघर्षमय प्रवासाची हृदयस्पर्शी कहाणी

Adhik Maas Guru Pushya Amrit Yog : गुरूचे अलौकिक नक्षत्र भ्रमण; संगणकीय व्हायरसच्या युगात कशी साधाल वैश्विक कनेक्टिव्हिटी?

SCROLL FOR NEXT