Gosekhurd Dam
Gosekhurd Dam Sakal
महाराष्ट्र

Maharashtra Budget Session | विदर्भाचा पाणी प्रश्न मिटणार, गोसीखुर्दसाठी अजित पवारांची मोठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Budget Session 2022 : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. मागील चार वर्षात महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढलं आहे. मात्र अद्याप मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्याचा अनुषेश भरलेला नाही. उन्हाळा सुरू होत असल्याने पाण्याचं नियोजन आवश्यक आहे. दरम्यान, अजित पवारांनी राज्याच्या जलसंपदा विभागाला १३ हजार ५५२ कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. (Maharashtra Budget 2022)

राज्यातील विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी या निधीची तरतूद करत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. सन २०२२ -२३ मध्ये २८ सिंचन प्रकल्प पूर्ण केले आहेत. यावेळी विदर्भाचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी गोसीखुर्द प्रकल्पाला ८५३ कोटी ४५ लाख रुपये मंजूर केले आहेत. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पडणाऱ्या दुष्काळावर मात करता येईल, असं ते म्हणाले.

  • मागील दोन वर्षात 28 सिंचन प्रकल्पात पाणीसाठा केला

  • येत्या दोन वर्षात 104 प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन

  • गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी सन 2022-23 मधे 853 कोटी 45 लाख रुपये निधी

  • मृद व जलसंधारणाची दोन वर्षात 4 हजार 885 कामांचं नियोजन

  • 4 हजार 774 कोटी रुपये खर्च प्रस्ताव‍ित

  • सन 2022-23 मधे 60 हजार कृषिपंपांना वीज जोडणीचे उद्दीष्ट

तीन राज्य आणि ९ जिल्ह्यांत धरणाचा विस्तार

गोसीखुर्दपासून वर्धापर्यंत वैनगंगेची वहन क्षमता ९ हजार क्युमेक्स म्हणजे ३ लाख १७ हजार क्युसेक आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया, नागपूर, मध्यप्रदेशातील मंडला, बालाघाट, शिवणी, बैतुल, छिंदवाडा आणि छत्तीसगडमधील राजनांदगाव यांचा समावेश आहे.

चंद्रपूरचा जिल्ह्यातील पावसाचा परिणाम गोसीखुर्दवर होत नाही. पण गोसीखुर्द ओव्हरफ्लो झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याला धोका संभवतो. २०२० वर्षीच्या तुलनेत २०२१ या वर्षी १०१ टक्के पाऊस झाला. यामुळे गोसाखुर्द धरणाचे १३ दरवाजे उघडण्याचा निर्णय झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT