Ajit Pawar Balasaheb Thorat may meet CM Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजितदादांची नाराजी अन् आमच्या केसचा...; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठ विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच अजित पवार भाजपसोबत जाणार या चर्चामुळे शिंदे गटालाही धक्का बसू शकतो. त्यातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी अजित पवारांबाबत बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार हे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून नाराज आहेत. मात्र अजित पवार यांची नाराजी आणि आमची सर्वोच्च न्यायालयातील केसचा काहीही संबंध नाही, असा दावाही शिरसाट यांनी केला आहे.

यावेळी शिरसाट यांनी अनेक गौप्यस्फोट केले. ते म्हणाले की, नागपूर येथे आयोजित वज्रमुठ सभेत अजित पवार यांना बोलू दिलं नाही. १० मिनिट बोलू दिलं असतं तर काय झालं असतं. मात्र त्यांना बोलू दिलं नाही. तसेच धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांचेही फोन उचलत नव्हते, असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT