Ajit Pawar News esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : 'त्या' घटनेवरून अजित पवार संतापले, म्हणाले तुम्हाला कोणी रोखलं...

रवींद्र देशमुख

Ajit Pawar News: मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

त्यामुळे ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होतं. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना एकनाथ शिंदे सरकारवर कडाडून टीका केली.

नवी मुंबईतल्या खारघर येथे राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. (Latest Marathi News)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र या कार्यक्रमानंतर उष्माधाताने १३ श्रीसेवकांचा मृत्यू झाला. यावरून अजित पवार संतापलेले पाहायला मिळाले.

अजित पवार म्हणाले की, माध्यमांमध्ये माझ्याविषयी सातत्याने बातम्या येत आहे. मात्र तस काहीच नाही. शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालीच पक्षाची स्थापना झाली आहे.

मात्र ज्याकाही बातमी पसरवल्या जात आहेत त्या फक्त लक्ष भरकटवण्यासाठीच आहे. तसेच आमदारांच्या सह्या घेतल्या नसून जे आमदार मुंबईत आले आहेत, ते त्यांच्या कामासाठी आले आहेत.

श्रीसेवकांच्या मृत्यूवर अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी कोट्यवधी खर्च करण्यात आला. मग मंडप टाकण्यासाठी तुम्हाला कोणी रोखलं होतं, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT