Ajit Pawar Latest News  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Political Crisis : आषाढी एकादशीच्या दिवशी शिजली सत्तेची साबुदाणा खिचडी; 'इथे' ठरला संपूर्ण प्लॅन

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज महाभूकंप बघायला मिळाला. अजित पवार यांच्यासोबत शरद पवारांच्या अत्यंत जवळचे नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शरद पवारांनी मात्र आपण पुन्हा कामाला लागू आणि पक्ष उभा करु, अशी भूमिका घेतली आहे.

अजित पवारांना सोबत घेऊन त्यांच्या गटाला मंत्रिपदं देण्यासंबंधीचा निर्णय २९ जून २०२३ रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी झाल्याचं समोर येत आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे निघाले होते त्यावेळी मुंबई विमानतळावर शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये पाच वाजता १० मिनिटं चर्चा झाली होती.

त्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले. पुन्हा मध्यरात्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये तब्बल चार तास बैठक झाली होती. त्याच बैठीकमध्ये सत्तेची साबुदाणा खिचडी शिजल्याची माहिती आहे.

अजित पवारांना कोणतं खातं द्यायचं, कुणाला मंत्री करायचं, कुठलं खातं द्यायचं आणि सत्तेचा मेळ कसा बसवायचा; यासंबंधी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानुसार आज अजित पवार यांच्यासोबत ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांचा समावेश आहे. आता भाजपचे ९, शिंदे गटाचे ९ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९ असे ३६ मंत्री मंत्रिमंडळामध्ये असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT