Ajit Pawar NCP news Sharad Pawar vs ajit pawar 5 july ncp party meeting in Mumbai NCP Crisis  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Vs Sharad Pawar : तारीख ठरली, वेळ ही ठरली! अजित पवार अन् शरद पवारांच्यात कोण भारी 'इथे' ठरणार

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान काल झालेल्या या राजकीय भुकंपानंतर शरद पवार विरूद्ध अजित पवार असा सामना राज्यातील राजकारणात पाहायला मिळत आहे.

यादरम्यान राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत असे अजित पवार म्हणाले आहेत. तर शरद पवारांनी मात्र या निर्णयाला माझं समर्थन नसल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट फडल्यानंतर शरद पवारांनी लगेचच पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे. तर अजित पवार यांनी त्यांच्या गटाला सरकारमध्ये कोणते मंत्रिपदे मिळतील यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

या तारखेला होणार सामना

यादरम्यान राष्ट्रवादी पक्षात कोणाचा शब्द चालणार आणि कोणाच्या पाठीशी किती किती संख्याबळ आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शरद पवार आणि आजित पवार या दोन गटांमध्ये कोणते आमदार-खासदार जाणार याकडे देखील महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यादरम्यान आता ५ जुलै रोजी हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

शरद पवार यांनी यांनी बुधवार, ५ जुलै रोजी, दुपारी १ वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला पक्षातील सर्व नेते व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे, अजित पवार यांच्या गटाकडून देखील ५ जुलै रोजीच सर्व समर्थक आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतच बोलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ५ तारखेला मेळावा घेण्याच्या तयारीत अजित पवार गट असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता राज्यातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांकडून एकाच दिवशी बोलवण्यात आल्याने कोणत्या बैठकीला राष्ट्रवादीचे कोणते नेते उपस्थित राहतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या पदाधिकारी बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

एका मर्यादेपर्यंत वाट पाहू..

या बंडानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ९ अमदार सोडून इतर आमदार संपर्कात आहेत त्यांना पक्षाचे दरवाजे खुले आहेत. पण आम्ही एका मर्यादेपर्यंतत थांबू नंतर त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करू असे त्यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी पक्षात परतण्यासाठी एका मर्यादेपर्यंतच थांबू असे जयंत पाटील म्हणाले असून अनेक जण संभ्रममुळे तिकडे गेले होते. ते सगळे मला फोन करत आहेत. शरद पवार साहेबांबरोबर लोक आहेत असेही त्यांनी सांगितले. आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून कारवाई करण्यास सांगितले आहे. निवडणुक आयोगाकडे आज तक्रार दाखल करणार असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर

काल झालेल्या शपथविधीनंतर अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर महत्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे याच्यासह केवळ नवनियुक्त मंत्र्यांचा समावेश होता. तसेच या बैठकीत खाते वाटप आणि शरद पवार गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आलेली अपात्रतेची याचिका तसेच अपात्रतेची कारवाई याबद्दल बैठकीत चर्चा झाली.

देवगिरीवरील दीड तासाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल एकाच गाडीतून सागर बंगल्यावर गेल्याचे पाहयला मिळाले. राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणती खाती येणार ? यावर बैठकीत चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT