NCP-Shivsena Sakal
महाराष्ट्र बातम्या

NCP-Shivsena : राष्ट्रवादीतील फुटीनंतर उद्धव ठाकरें गटाचा 'एकला चलो'चा नारा; मविआतून पडणार बाहेर?

राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यामुळे आता महाविकास आघाडीतल्या शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडली असून कालपर्यंत विरोधीपक्षनेते असलेले अजित पवार यांनी बंड केले आणि शिंदे भाजप सरकारमध्ये सामील झाले. काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाले असून महाविकास आघाडीची पुढची दिशा काय असेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीतील फूट पाहून शिवसेना ठाकरे गटातील आमदारांची उद्या मुंबईत बैठक होणार असून महाविकास आघाडी आणि पुढील वाटचालीचा निर्णय घेण्यात येणार आहे. तर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडून येणाऱ्या निवडणुकात स्वबळावर लढेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांंनी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर "उद्धव ठाकरे यांनी आता 'सत्तांतर करो', 'एकला चलो'चा नारा देऊन लोकांमध्ये जायला पाहिजे अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे." असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिवसेना पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मोठं बंड घडलं. ते आपल्यासोबत ४० आमदार घेऊन भाजपकडे गेले आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकाच वर्षामध्ये राष्ट्रवादीतही फूट पडल्याने मोठा राजकीय भूकंप झाला असून यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही बिघाड होतोय का याकडे लक्ष असणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांना तात्पुरते विरोधीपक्षनेते पद देण्यात आले आहे पण विरोधीपक्षांपैकी काँग्रेस पक्षाकडे संख्याबळ असल्यामुळे विरोधीपक्षनेते पद कुणाकडे जाईल याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT