Ajit Pawar press conference 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Press Conference : राष्ट्रवादीत फूट नाही, पण बहुमत अजितदादांच्या पाठिशी; पटेलांचा दावा

Sandip Kapde

Ajit Pawar press conference :  अजित पवार गटाने आज पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बंड केला आहे. शरद पवार यांनी देखील अजित पवार यांच्या विरूद्ध दंड थोपटले आहे. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत घेत ३० तारखेपासून झालेला घटनाक्रम सांगितला. 

३० जून २०२३ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अनेक लोक उपस्थित होते. देवगीरीला ही बैठक झाली. राष्ट्रवादीचे आमदार, कार्यकर्ते देखील होते. या बैठकीत सर्वांनी अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.

त्यामुळे अजित पवार यांनी प्रथम प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले. तसेच अजित पवार पक्षाचे नेते आहेत हे सुचित केलं. तसेच अनिल पाटील यांना प्रतोद म्हणून कायम ठेवले. तसेच अमोल मिटकरी यांना विधानपरिषदेचे प्रतोद म्हणून नियुक्त करत आहोत.

आम्ही निवडणूक आयोगात देखील याचिका दाखल केली आहे. ३० तारखेपासून निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या दारात हा विषय गेला आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत. त्यामुळे पक्ष चिन्ह आम्हाला मिळाले पाहिजे, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केली. कारण बहुमत अजित पवार यांच्याकडे आहे.

काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. ती अधिकृत बैठक नव्हती. कारण आमच्या घटनेत काही नियम आहेत. या नियमानुसार सगळी प्रक्रिया आहे. 

प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. "कोणतीही नियुक्ती ही निवडणुकीच्या माध्यमातून व्हावी लागते, पण आमच्याकडे कधीच तसं झालं नाही. महाराष्ट्रातच कधीच निवडणुका झाल्या नाहीत तर इतर ठिकाणचा विषयच येत नाही.
मी माझ्या सहीने राष्ट्रीय पातळीवर अनेक नियुक्त्या केल्या आहे, त्या सगळ्या बेकायदेशीर आहेत," असे पटेल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT