NCP Ajit Pawar on CM eknath shinde birthday kasaba by election koyata gang Maharashtra politics  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : मुख्यमंत्री म्हणून शिंदेंपेक्षा जास्त पसंती! अजित पवार म्हणाले, तुम्हाला राहायचंय की नाही महाराष्ट्रात?

रोहित कणसे

राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जय्यत तायरी सुरू केली आहे. यादरम्यान निवडणूकांचे निकाल काय असतील याबद्दल अनेक संस्थांकडून सर्व्हे करण्यात येत आहेत.

असाच एक सर्व्हे 'न्यूज एरिना इंडिया' या संस्थेने केला असून यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा देखील अजित पवारांना जास्त पंसती मिळाली आहे. याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर अजित पवारांना खास त्यांच्या स्टाईलमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांचा CM शिंदेंना खोचक टोला

या सर्व्हेमध्ये देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिक मते आणि त्यापाठोपाठ तुम्हाला विद्यामान मुख्यमंत्र्यांपेक्षा देखील जास्त २१ टक्के पसंती मिळाली आहे असे ऐकताच अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं. मिश्किल भाषेत अजित पवार म्हणाले की, "काय बोलताय तुम्ही? किती धादांत खोटं बोलताय, तुम्ही परवा जाहिरात बघीतली नाही? २६ टक्के एकनाथराव शिंदेंना पाठिंबा मिळालाय आणि तुम्ही काहीतरीच सांगताय. तुम्हाला राहायचंय की नाही महाराष्ट्रात?"

या सर्व्हेत काय म्हटलंय?

'न्यूज एरिना इंडिया' या संस्थेने देशभरातील राज्यांच्या निवडणूकांबद्दल सर्व्हे केला आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत सध्याच्या घडीला भाजपा १२३ ते १२९ तर एकनाथ शिंदेंची शिवसेना २५ जागा मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस ५५ ते ५६, काँग्रेस ५० ते ५३ तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १७ ते १९आणि इतर १२जागा मिळवतीस असे सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री पदासाठी जनतेची पसंती कोणाला?

मुख्यमंत्री पदासाठी कोणत्या उमेदवाराला पसंती देणार असा प्रश्न विचारला असता मतदारांनी देवेंद्र फडणवीसांनी पसंती मिळाली आहे. या सर्व्हेनुसार देवेंद्र फडणवीस (३५%), अशोक चव्हाण (२१%) आणि तिसऱ्या क्रमांकावर विरोधीपक्षनेते अजित पवार (१४%) आहेत, त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे (१२%), उद्धव ठाकरे (९%), इतर (९%) अशी मते मिळाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HBA Scheme: तुम्ही होम लोनचा हप्ता भरू शकत नाहीत? सरकारकडून मिळतेय 25 लाख रुपयांची मदत

Disqualification Bill: पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना 30 दिवस तुरुंगवास झाल्यास पदमुक्त होणार! संसदेत मांडलं जाणार ऐतिहासिक विधेयक

Mobile Protection Tips: पावसाळ्यात मोबाईल भिजतोय? काळजी करू नका, हे उपाय करा!

Prithvi Shaw : मला कुणाची सहानुभूति नकोय... महाराष्ट्र संघाकडून शतक झळकावताच पृथ्वी शॉचा आजी-माजी खेळाडूंना टोमणा

Chiploon Karad Accident : चिपळूण-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात पुण्याचे ५ जण ठार, रिक्षाचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT