Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

पहाटेचा शपथविधी, शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच अजितदादा भडकले

सकाळ डिजिटल टीम

माझ्या एका वक्त्व्याने सेना-भाजपमधलं अंतर वाढलं आणि मी जर अजित पवाराना पाठवलं असतं तर सरकार पडलंच नसतं असंही पवारांनी म्हटलं होतं.

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी (Assembly Election) झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही होत असते. यावरच विचाऱण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी म्हटलं होतं की, 'विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपासोबत (BJP) पाठवलं अशी चर्चा होत असते, पण मी पाठवलं असतं, तर त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं. मी अजित पवार यांना पाठवलं होतं यात काहीच अर्थ नाही.' एका कार्यक्रमात शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. आता शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारल्यानंतर अजित पवारांनी बोलणं टाळलं.

शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार यांना प्रश्न विचारताच ते भडकले. ते म्हणाले की,'मला त्याबद्दल काही बोलायचं नाही, मी आधीच सांगितलं आहे. याबद्दल काही बोलायचं नाही, ज्यावेळेस मला वाटेल तेव्हा मी बोलेन, तो माझा अधिकार आहे.' विषय संपला, असं म्हणत अजित पवार यांनी पत्रकारांना पुढचा प्रश्न विचारण्यास सांगितलं.

शरद पवार यांनी भाजप शिवसेनेत अंतर वाढायला त्यांच एक वाक्य कसं कारणीभूत ठरलं तेसुद्धा कार्यक्रमात सांगितलं. निवडणुकीनंततर मी दिल्लीत बोललो होतो की फडणवीसांना बहुमतासाठी काही कमी पडत असेल तर आम्ही त्यावर गांभीर्यानं विचार करू. माझं ते वक्तव्य सेना-भाजप यांच्यातील अंतर वाढवण्यास उपयोगी पडलं असं वक्तव्य मिश्किलपणे शरद पवार यांनी केलं.

ते दोघेही एकत्र यावेत असा प्रयत्न केला असता तर आम्ही ५ वर्षे सत्तेबाहेर राहिलो असतो. सेनेत अस्वस्थता दिसत होती. मुख्यमंत्रीपदाची त्यांची मागणी होती. त्यावेली पोषक वक्तव्य केल्यानं नुकसान होणार नव्हतं. त्या एका वक्तव्यानं सेनेत अस्वस्थता निर्माण झाली आणि फडणवीस राष्ट्रवादीसोबत जाऊ शकतात अशी शक्यता बनली. त्यामुळेच सेना आमच्यासोबत सत्तेत आली असंही पवारांनी या कार्यक्रमात सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माजी पंतप्रधानांच्या मुलासोबत व्हॉट्सॲपवर सायबर फ्रॉड; 7.8 कोटी रुपये अकाऊंटमधून गायब, अशा परिस्थितीत कसं सुरक्षित राहायचं? पाहा

Ambajogai Crime: अंबाजोगाईत धक्कादायक घटना! अभ्यासिकेतून परतणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला; जखमी अवस्थेत आईला शेवटचा फोन

Nanded: ॲपेतून डिझेल वाहतुकीचा धंदा; सुरक्षा नियमांची ऐशी तैशी !, इतरांचा जीव धोक्यात

Manoj Jarange : हैदराबाद गॅझेटचा प्रश्न मार्गी; कुणबी प्रमाणपत्रासाठी उद्यापासून अर्ज करा, जरांगेंचं आवाहन, नोंदी नसल्या तरी चिंता नाही

Fifa World Cup 2026: हे नाव लक्षात ठेवा, Jonathan David! पठ्ठ्याने ९६ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी, १९६६चा आणखी एक पराक्रम मोडला

SCROLL FOR NEXT