Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

PM मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला अजित पवारांचे उत्तर; म्हणाले...

धनश्री ओतारी

जनतेने निवडून दिलं असेल तर घराणेशाही कशी म्हणता येईल. असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला उत्तर दिले आहे.(Ajit Pawar reply to PM Modi's dynastic criticism nepotism)

तिरंगा फडकवल्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी स्वातंत्र्यदिनाचं भाषण सुरू केलं. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार देशाला पोखरत आहे आणि घराणेशाही राजकारणातूनही संधी हिसकावून घेत आहे. घराणेशाहीच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी यापूर्वी राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच घराणेशाही संपवण्यासाठीच्या लढ्यात आपल्याला साथ देण्याचं आवाहनही पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

PM मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला अजित पवारांचे उत्तर

लोकशाहीत घराणेशाही कुणीही आणु शकत नाही. जनतेने निवडून दिलं असेल तर घराणेशाही कशी? असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी पंतप्रधानांच्या टीकेला उत्तर दिले आहे. तसेच त्यांनी यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कारकिर्दीचा आठवण करुन दिली.

जर कुणाच काम चांगल असेल तर आजपर्यंत आपण पाहिलं लोकांनी त्यांना निवडुण दिलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांची कारकिर्द पाहिली. त्यानंतर इंदिरा गांधी यांची कारकिर्दी पाहिली, एक पोलादी स्त्री म्हणून त्या लोकप्रिय आहेत. त्यानंतरच्या काळामध्ये आपण राजीव गांधी याचीही कारकिर्द पाहिली.कॉम्प्युटरच युग हे खऱ्या अर्थांनी त्यांनी आणलं.

हे जे काही घराणेशाही घराणेशाही म्हटलं जात ज्यांच्यामध्ये कुवत नाही ताकद नाही कर्तृत्व नाही. अशांना जर बळजबरीने पदावर बसवले तर तुम्ही त्याच्यामध्ये घराणेशाही म्हणू शकता. परंतु एखाद्याच्या घरामध्ये जन्माला आलेली पुढची पिढी कर्तुत्वान असेल तर आणि लोकशाही पद्धतीने त्यांना त्यांच्या भागातील जनतेने आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणण साफ चुकीच आहे. अशा शब्दात मोदींच्या विधानावर अजित पवार यांनी पलटवार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dams Water Level : पुणेकरांसाठी मोठी बातमी! चारही धरणे 100% भरली; पण आज 'या' भागात पाणीच नाही

Farmer Accident Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अपघात सुरक्षा योजनेत आता संपूर्ण कुटुंबाला संरक्षण, 2031 पर्यंत मुदतवाढ

Mumbai Local Train Viral Video : माथेफिरुने रोखली लोकल ट्रेन, धाडसी प्रवाशामुळे टळली मोठी दुर्घटना; रुळांवरचा थरार कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Gold Rate Today: RBI च्या निर्णयानंतर ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा सोन्याच्या भावात मोठा बदल! आज 10 ग्रॅमचा ताजा भाव किती?

Kolhapur Flood: हिप्परगी, आलमट्टीत पाणी साठ्याचे निकष धाब्यावर; ‘आंदोलन अंकुश’च्या पाहणीत स्पष्ट, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महापुराचे संकट

SCROLL FOR NEXT