Parth Pawar: esakal
महाराष्ट्र बातम्या

Parth Pawar: 'आजोबांच्या अन्यायामुळे पार्थ शंभुराज देसाईंच्या भेटीला'; चर्चेला उधाण

पार्थ पवार राजकारणात पुन्हा सक्रिया झाले का?

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार अधिवेशनादरम्यान नागपुरात गेल्याने चर्चेला उधाण आलं होतं. दरम्यान आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार घेतली आहे. या भेटीनंतर भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया देताना मोठा दावा केला आहे.

एकिकडे राज्यातील रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे.

शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार पदाधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच पार्थ पवार शिंदे गटाच्या नेत्याची भेट घेत आहे.

हेही वाचा: Amruta Fadanvis : अमृता फडणवीस यांची ‘ती’ क्लिप वादाच्या भोवऱ्यात

त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पार्थ पवार राजकारणात पुन्हा सक्रिया झाले का? देसाईंच्या भेटीमागचे नेमकं काय कारण? असे सवाल उपस्थित होता आहे.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

दरम्यान, गोपिचंद पडळकर यांनी पार्थ देसाईंच्या भेटवरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी. रोहित पवार आमदार झाले. बारामती अॅग्रो त्यांच्याकडे आहे. मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही झाले. आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थची असेल. असा मोठा दावा पडळकर यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनिने दिलेल्या माहितीनुसार, पार्थ पवार शंभुराज देसाईंच्या भेटीसाठी पोहचले आहेत. त्यांच्या भेटीमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असात वैयक्तिक कारणास्तव भेट घेतली असल्याचे पार्थ पवार म्हणाले. आणि अधिक बोलणं टाळलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : जालन्यात मराठा समाज बांधवांची बैठक

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

Umarga Crime : तरुणाच्या खुन प्रकरणातील दोन आरोपींना अटक; उमरगा पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी

SCROLL FOR NEXT