Akola Paschim 
महाराष्ट्र बातम्या

ByElection Cancelled: 'अकोला पश्चिम' विधानसभा पोटनिवडणूक हायकोर्टाकडून रद्द! काय घडलंय नेमकं जाणून घ्या

अकोला पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांच निधन झाल्यानं ही जागा रिक्त झाली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं नुकताच जाहीर केला, त्याचबरोबर देशभरातील काही पोटनिवडणुकांच्या निवडणुकाही जाहीर करण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्रात अकोला पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांच निधन झाल्यानं ही जागा रिक्त झाली होती.

या जागेवरही पोटनिवडणूक लागली होती, पण आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं ही निवडणूक रद्द ठरवली आहे. (akola west by election cancelled by nagpur high court bench what happened need to know)

हायकोर्टानं का केली निवडणूक रद्द?

महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला आता एक वर्षापेक्षा कमी कार्यकाळ बाकी शिल्लक आहे. त्याचबरोबर जर महाराष्ट्रात पोटनिवडणूक झाली तर त्याचा निकाल हा ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर केवळ चारच महिन्यांचा कार्यकाळ तिथं निवडणून आलेल्या आमदाराला मिळू शकतो.

पण यासाठी निवडणूक खर्च करणं आणि सुरक्षा यंत्रणा राबवणं हे निरर्थक असल्यानं ही पोटनिवडणूक रद्द करण्यात यावी यासाठी नागपूर खंडपीठामध्ये शिवकुमार दुबे यांनी याचिका दाखल केली होती. (Latest Marathi News)

दरम्यान, 26 एप्रिल रोजी अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी मतदान पार पडणार होतं. ज्याचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार होता. त्यामुळं खंडपीठानं या पोटनिवडणुकीची अधिसूचना रद्द केली आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT