police fir sakal media
महाराष्ट्र बातम्या

एसटीचालकाबरोबर गैरवर्तन; अलिबाग पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : परळहून अलिबागला (Alibaug) एसटी घेऊन येणाऱ्या चालकाला (ST bus driver) कार्ले खिंडीत दोन अज्ञात व्यक्तींनी मारहाण (beating case) केली. त्यानंतर अलिबाग एसटी स्थानकात (Alibaug ST bus depot) आंदोलनकर्त्यांनी चालकाला बांगड्या घालून चालकाचा निषेध केला. ही घटना सोमवारी सकाळी पावणेनऊ ते साडेनऊ या दरम्यान घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल (Police FIR) करण्यात आला.

एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारला होता; तरीदेखील परळ आगारातील एसटीचालक काशिनाथ गायकवाड हे सोमवारी सकाळी सहा वाजता, वाहकांसमवेत प्रवासी घेऊन अलिबागकडे निघाले. अलिबाग-पेण मार्गावरील कार्ले खिंड येथे आल्यावर उतरणाऱ्या प्रवाशांसाठी बस थांबविण्यात आली. त्याच वेळी दोन अज्ञात व्यक्ती एसटीमध्ये घुसल्या. त्यांनी चालकाला धक्काबुक्कीसह मारहाण करून शिवीगाळ केली. त्या वेळी चालकाने काहीही वाद न घालता एसटी अलिबाग एसटी बस स्थानकात आणली.

प्रवासी उतरल्यानंतर पुन्हा एसटी परळला जाण्यासाठी निघाली. दरम्यान संपावर असलेल्या काही एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत चालकासह वाहकाच्या गळ्यात हार घातला. चालकाला बांगड्या घालून त्याचा निषेध केला. या प्रकारामुळे एसटीचालकासह वाहकाने अलिबाग पोलिस ठाणे गाठले. कार्ले खिंड व स्थानकात झालेल्या या प्रकाराबाबत चालक गायकवाड यांनी सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT